Murlidhar mohol reaction on ravindra dhangekar share video of gokhale construction advertisement
Muralidhar Mohol : पुणे : पुण्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आहेत. मात्र त्यापूर्वी महायुतीमध्ये जोरदार वाद निर्माण झाला आहे. भाजप नेते आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या विक्री प्रकरणाबाबत आरोप केले जात आहेत. यासंबंधित शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांचा व्हिडिओ देखील शेअर केला. यामध्ये मुरलीधर मोहोळ हे गोखलेची जाहिरात करत आहेत. यावरुन जोरदार टीका झाल्यानंतर खासदार मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रवींद्र धंगेकर यांनी दोन दिवसांपूर्वी खासदार मुरलीधर मोहोळ यांचा व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये ते बांधकाम व्यवसायिक विशाल गोखले यांच्या साईटची जाहिरात करत आहेत. यामध्ये त्यांनी प्रोजेक्टची माहिती दिली. खासदार मोहोळ यांची व्हिडिओ शेअर करत रवींद्र धंगेकर यांनी लिहिले की, कंपनी गोखलेंची कमी यांचीच जास्त असल्याचे जाणवते, कारण हे महाशय अगदी फ्लॅट दाखवण्याच्या जाहिराती देखील स्वतःच करायचे. सेही 50% भागीदार म्हणजे कंपनीचा निम्मा मालक असतो. उगीच मंत्रीपदाच्या नियमामुळे मंत्रीपद मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी जड अंतकरणाने हे कंपनीतून बाहेर पडले. बर खरच बाहेर पडले की फक्त कागदोपत्री बाहेर पडलेत हे देव जाणे… कारण यांचे 50 टक्क्यांचे शेअर्स कुणाला दिलेत याच्याबद्दल कोणतीच माहिती यांनी दाखवलेली नाही. मुळे कंपनीच्या भविष्यातील 30,000 कोटींचा फायद्याच्या प्रोजेक्टमध्ये यांची इन्व्हॉलमेंट नसणार का…? काय वाटतं…? शाल पुणेकरांना वेड्यात काढताय, अशी टीका रवींद्र धंगेकर यांनी खासदार मोहोळ यांच्यावर केली.
कंपनी गोखलेंची कमी यांचीच जास्त असल्याचे जाणवते, कारण हे महाशय अगदी फ्लॅट दाखवण्याच्या जाहिराती देखील स्वतःच करायचे. तसेही 50% भागीदार म्हणजे कंपनीचा निम्मा मालक असतो. उगीच मंत्रीपदाच्या नियमामुळे मंत्रीपद मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी जड अंतकरणाने हे कंपनीतून बाहेर पडले. बर खरच… pic.twitter.com/fNeOKb5SWG — Ravindra Dhangekar Official (@DhangekarRavii) October 20, 2025
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावरुन जोरदार राजकारण रंगल्यानंतर खासदार मोहोळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच त्यांनी रवींद्र धंगेकर यांना नैराश्य आले असल्याचे म्हणत टीकास्त्र डागले. तसेच रवींद्र धंगेकर यांना चावी देणारं दुसरंच कोणी असेल अशी टीका देखील मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. तसेच रवींद्र धंगेकर यांच्या आरोपाला शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी देखील पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात पुण्यातील विरोधक एकवटत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले मुरलीधर मोहोळ?
रवींद्र धंगेकर यांच्या व्हिडिओबाबत आरोपावर खासदार मुरलीधर मोहोळ म्हणाले की, “रवींद्र चंगेकर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील राभवामुळे आलेल्या नैराश्यातून हे आरोप करत आहेत. वैफल्यग्रस्त माणसाकडून दुसरी अपेक्षा करता येणार नाही. विशाल गोखले माझा मित्र होता, आहे आणि राहणार आहे. ५ वर्षांपूर्वीचा एक व्हिडीओ काढला आणि त्यात सांगितले की मी जाहिरात करतो. पण तो ५ वर्षांपूर्वीचा आहे. तो काही काल-परवाचा नाही, जैन बोर्डिंगच्या विषयातही सत्यता तपासा आणि मग बोला कुणी कुणाची जाहिरात केली तर काय व्यवसायात भागीदार होत का? या शहराची एक राजकीय संस्कृती आहे. एक माणूस या संस्कृतीची वाट लावत आहे”, अशा शब्दांत मुरलीधर मोहोळ यांनी स्वींद्र धंगेकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला.