काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद समोर; स्वबळावर लढू म्हणणारे जगताप आता म्हणतात, 'हायकमांड ठरवेल...' (संग्रहित फोटो)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यातच, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू युती करण्याची शक्यता आहे. मात्र, महाविकास आघाडीचा भाग असलेला काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे मुंबई महापालिका लढवणार, अशी भूमिका मुंबईचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी मांडली होती. नंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावरून यू-टर्न घेतला.
दुसरीकडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अध्यक्ष राज ठाकरे यांचे स्वागत म्हणत मोठे वक्तव्य केले. शिवाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही भाई जगताप यांचीच री ओढल्यामुळे ठाकरे बंधूमुळे काँग्रेसमध्ये दोन गट पडले का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे व मनसेप्रमुख राज ठाकरे हे बंधू 20 वर्षांनी एकत्र आले आहेत. ठाकरे बंधू युती करण्याची शक्यता आहे. त्यातच महाविकास आघाडीचा भाग असलेला काँग्रेस स्वतंत्रपणे मुंबई महानगरपालिका लढवणार, अशी भूमिका मुंबईचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी मांडली होती.
तसेच, मुंबईबाबत हायकमांड भूमिका ठरवले. ती माझी वैयक्तिक तसेच माजी अध्यक्ष म्हणून भूमिका होती, असे म्हणत जगताप यांनी आपल्याच वक्तव्यावर यू-टर्न घेतला. मुंबई महापालिका निवडणूक स्थानिक कार्यकर्त्यांची आहे. पक्षाचा झेंडा अनेक वर्षांपासून खांद्यावर मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांची लढण्याची इच्छा असते. म्हणून मी स्वबळाची भूमिका मांडली. राजकीय कामकाज समितीच्या बैठकीत प्रभारी रमेश चेन्निधला यांच्यासमोर मी हेच सांगितले होते.
दरम्यान, राज ठाकरे तर दूरच, आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही, असेही त्यांनी म्हटले. यानंतर जगताप यांनी आपल्या वक्तव्यावरून यू-टर्न घेतला. तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरे यांचे स्वागत म्हणत मोठे वक्तव्य केले.
राज यांचा अद्याप प्रस्ताव आला नाही
वडेट्टीवार म्हणाले, निवडणुका स्थानिक आहेत, स्थानिक प्रश्न घेऊन लढले पाहिजे. एखाद्या पक्षाला आघाडीत घेण्याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील. कारण आता केवळ चर्चा आहे. अंतिम काहीही नाही. आमची ग्रामीण भागात इतर पक्षांशी युती दिसेल, असे वडेट्टीवार म्हणाले, मनसे सोबत असेल का? या प्रश्नावर ते म्हणाले, राज यांना सोबत घ्यायचे असेल तेव्हा बोलू. सध्या राज यांच्याकडून आधाडीसोबत येण्याचा प्रस्ताव आलेला नाही, एखाद्या पक्षाला घ्यायचे, तर प्रस्ताव पाहिजे. सध्या नुसती चर्चा आहे.
हेदेखील वाचा : तेजस्वी यादव महाआघाडीचा मुख्यमंत्र्यांचा चेहरा, दोन उपमुख्यमंत्र्यांचीही नियुक्ती; अशोक गेहलोत यांची मोठी घोषणा