Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघातामुळं उपचार घेत असलेल्या रुग्णांची मविआ नेत्यांनी घेतली भेट; मृत्य श्रीसेवकांना वाहिली श्रद्धांजली…

मविआ नेत्यांनी रात्री उशिरा नागपूरमधील वज्रमूठ सभा संपल्यानंतर उष्माघातामुळं आजारी पडलेल्या रुग्णांवर रुग्णालयात जाऊन विचारपूस करत, त्यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी एमजीएम हॉस्पिटल नवी मुंबई येथे भेट देऊन तेथे उपचार घेणाऱ्या रुग्णांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. तसेच खारघर येथील पुरस्कार सोहळ्यात मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांनाही दोघांनी श्रध्दांजली वाहिली.

  • By Amrut Sutar
Updated On: Apr 17, 2023 | 09:14 AM
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघातामुळं उपचार घेत असलेल्या रुग्णांची मविआ नेत्यांनी घेतली भेट; मृत्य श्रीसेवकांना वाहिली श्रद्धांजली…
Follow Us
Close
Follow Us:

नवी मुंबई : रविवारी म्हणजे काल महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान सोहळा कार्यक्रम पार पडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Sshah) यांच्या उपस्थितीत अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण सन्मान देण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde)  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis) हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. पण भर दुपारी पार पडलेल्या याच कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या काही जणांना तीव्र उष्णतेचा मोठा त्रास जाणवू लागला. त्यानंतर अनेक श्रीसेवकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.  यामध्ये सात-आठ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आणखी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जातंय. तसेच यातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

#WATCH| Navi Mumbai: Uddhav Thackeray, Aditya Thackeray & NCP leader Ajit Pawar interact with Doctor in MGM Kamothe Hospital, take stock of the situation

11 people died & more than 20 are undergoing treatment after they suffered heatstroke during Maharashtra Bhushan Award… pic.twitter.com/0nNGvGlFXW

— ANI (@ANI) April 16, 2023

रुग्णांची मविआ नेत्यांनी घेतली भेट…

दरम्यान, मविआ नेत्यांनी रात्री उशिरा नागपूरमधील वज्रमूठ सभा संपल्यानंतर उष्माघातामुळं आजारी पडलेल्या रुग्णांवर रुग्णालयात जाऊन विचारपूस करत, त्यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी एमजीएम हॉस्पिटल नवी मुंबई येथे भेट देऊन तेथे उपचार घेणाऱ्या रुग्णांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. तसेच खारघर येथील पुरस्कार सोहळ्यात मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांनाही दोघांनी श्रध्दांजली वाहिली असून, त्यांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त केली आहे. भरदुपारी झालेल्या या कार्यक्रमाला 20 लाख श्री सेवकांची उपस्थिती होती. कार्यक्रम दुपारी एकच्या सुमारास संपला, त्यानंतर भर उन्हात इतका वेळ बसलेल्या अनेकांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला.

शासनाकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत

खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मी या श्री सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे रात्री आठच्या सुमारास आले होते. मुख्यमंत्र्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधला. त्याचबरोबर तेथील डॉक्टर्ससोबत चर्चा करून उपचाराबाबत माहिती घेतली. उष्माघाताचा त्रास झाल्याने श्री सदस्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सोहळ्याच्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी काही श्री सदस्यांवर प्राथमिक उपचार केले. काहींना रुग्णालयात हलवावे लागले. एमजीएम रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समन्वयासाठी पनवेल महापालिकेचा उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

Web Title: Mva leaders visited the patients undergoing treatment due to heatstroke in the maharashtra bhushan programme tributes to the dead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2023 | 07:42 AM

Topics:  

  • appasaheb dharmadhikari

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.