महाराष्ट्रातील या जिल्ह्यात मलेरियाचं थैमान; आठवड्यात आढळले १०० रुग्ण, तिघांचा मृत्यू
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात मलेरियाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. दरम्यान, धानोरा तालुक्यातील सिन्सूर (मोहली) गावातील एका तरुणाचा शनिवारी (दि. 12) मलेरियाने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कपिल नामदेव पदा (25) असे मृत रुग्णाचे नाव आहे. विशेष म्हणजे, गेल्या 7 दिवसात गडचिरोली जिल्ह्यात मलेरियामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात मलेरिया रुग्णांच्या मृत्यूची मालिका थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे.
श्रावणातील पहिल्या सोमवारी नैवेद्यासाठी झटपट बनवा साबुदाणा रबडी, दिवसभराचा थकवा होईल दूर
प्राप्त माहितीनुसार, कपिल पदा याची प्रकृती बिघडल्यानंतर त्याला उपचारासाठी शंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे तपासणी केल्यानंतर तो मलेरिया पॉझिटिव्ह आढळून आला. त्यानंतर त्याच्यावर रांगीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात 3 दिवस उपचार करण्यात आले. परंतु, त्याची प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याच्यावर 3 दिवस उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याची प्रकृती गंभीर झाली आणि मलेरियामुळे त्याचा मृत्यू झाला. पावसाळा सुरू झाल्यापासून गडचिरोली जिल्ह्यात मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येसह मृत्यूची संख्याही वाढत आहे. असे असतानाही आरोग्य विभागाने मलेरियाच्या नियंत्रणासाठी गंभीर पाऊल उचललेले नाही. टास्क फोर्सही या कामात मदत करू शकत नसल्याचे दिसून येते.
चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात? तरुण वयातील ‘या’ चुकांमुळे त्वचा होते खराब, जाणून घ्या सविस्तर
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यांतर्गत येणाऱ्या कोटगुल प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या 12 दिवसांत 100 हून अधिक रुग्णांना मलेरियाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. आरोग्य यंत्रणा औषधांच्या माध्यमातून मलेरिया पॉझिटिव्ह लोकांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, अशी माहिती डॉ. स्वप्निल चोरुडे यांनी दिली.