Nagpur News : गोंडखैरीतील चोकरधानी रिसॉर्टमध्ये अवैध हुक्का पार्टीचा पर्दाफाश; पोलिसांकडून ६१ हजारांचे साहित्य जप्त

नागपूर-अमरावती महामार्गावरील गोंडखैरी येथील चोकरधानी रिसॉर्टमध्ये नागपूर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून ६१ हजार २०० रुपयांचे हुक्का पार्टीचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी रिसॉर्ट व्यवस्थापकाविरुद्ध कळमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हुक्का साहित्याच्या पुरवठा साखळीचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
फोटो सौजन्य : सोशल मीडिया
chokar dhani resort Hukka party scam फोटो सौजन्य : सोशल मीडिया
Published on: 
Updated on: 
  • गोपनीय माहितीच्या आधारे मध्यरात्री छापा

  • रिसॉर्ट व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

  • पुरवठा साखळी आणि व्यवस्थापनाच्या भूमिकेकडे लक्ष

Nagpur News : नागपूर-अमरावती महामार्गालगत गोंडखैरी परिसरातील चोकरधानी रेस्टॉरंट अँड रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या कथित अवैध हुक्का पार्टीचा नागपूर ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शुक्रवारी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून हुक्का पार्टीसाठी वापरण्यात येणारे ६१ हजार २०० रुपयांचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी रिसॉर्टच्या व्यवस्थापकाविरुद्ध कळमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे मध्यरात्री छापा

गोंडखैरी येथील चोकरधानी रिसॉर्टमध्ये हुक्का पार्टी सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्री रिसॉर्टवर छापा टाकला.

यावेळी रिसॉर्टच्या खुल्या लॉन परिसरात हुक्का पार्टीसाठी वापरण्यात येणारी सामग्री आढळून आली. पोलिसांनी घटनास्थळावरील संपूर्ण साहित्य जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या साहित्याची एकूण किंमत ६१ हजार २०० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

फोटो सौजन्य : सोशल मीडिया
Nagpur News : पुणेरी बाकरवडीचा नागपुरी फ्लेक्सला ठसका; मजेशीर जुगलबंदी

रिसॉर्ट व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

या कारवाईनंतर पोलिसांनी रिसॉर्टचा व्यवस्थापक शाहुल समरुद्दीन इस्लाम (वय २६, रा. लखीमपूर, आसाम) याच्याविरुद्ध कळमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरावर असलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर रिसॉर्टमध्ये अशा प्रकारची पार्टी कशी सुरू होती, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हुक्का फ्लेवरचा पुरवठा कुठून होत होता, त्याची खरेदी-विक्री कोण करत होते आणि हा प्रकार किती दिवसांपासून सुरू होता, याचा तपास पोलिसांकडून होणे अपेक्षित आहे.

फोटो सौजन्य : सोशल मीडिया
Nagpur News : एमबीबीएसची बनावट पदवी; ChatGPT चा वापर, ६ महिने जीएमसीत डॉक्टर म्हणून नोकरी

पुरवठा साखळी आणि व्यवस्थापनाच्या भूमिकेकडे लक्ष

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या एपीआय स्नेहल राऊत, राजकिरण मडावी, चवल देशमुख, पोलीस हवालदार किशोर वानखडे, उमेश फुलवेल आणि संजय बनते सहभागी होते. तसेच कळमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे, मल्हारी डोईफोडे, किशोर लोही, मनीष सोनवणे आणि अन्य कर्मचाऱ्यांनीही कारवाईत सहभाग घेतला.

या प्रकरणात केवळ हुक्का पार्टीचे साहित्य जप्त करून व्यवस्थापकावर कारवाई करण्यापुरताच तपास मर्यादित राहणार की हुक्का साहित्याचा पुरवठा करणारे आणि रिसॉर्ट व्यवस्थापनातील अन्य जबाबदार व्यक्तीही तपासाच्या कक्षेत येणार, याकडे लक्ष लागले आहे.