Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai : NMT कडून प्रवाशांची अडवणूक; पनवेल रेल्वे स्थानक मार्गावर प्रवाशांची गैरसोय

एन एम टी प्रशासनाकडून या मार्गांवरील बस च्या संख्येत घट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी फरफट होत  आहे.त्यामुळे बस सेवा पूर्ववत करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 12, 2025 | 04:08 PM
Navi Mumbai : NMT कडून प्रवाशांची अडवणूक; पनवेल रेल्वे स्थानक मार्गावर प्रवाशांची गैरसोय
Follow Us
Close
Follow Us:
  • पनवेल रेल्वे स्थानक मार्गावर प्रवाशांची गैरसोय
  • NMTकडून प्रवाशांची अडवणूक
  • नेंमकं प्रकरण काय ?

पनवेल/दीपक घरत : पालिका हद्दीतील खांदेश्वर रेल्वे स्थानक ते पनवेल रेल्वे स्थानकादरम्यानच्या मार्गांवर एन एम एम टी कडून 59 क्रमांकाची बस सेवा सुरु आहे. एन एम टी प्रशासनाकडून या मार्गांवरील बस च्या संख्येत घट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने या मार्गांवर दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी फरफट होत  आहे. त्यामुळे बस सेवा पूर्ववत करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.तशा स्वरुपाचे मेल देखील काही प्रवाशांनी एन एम एम टी प्रशासनाकडे केले आहेत. मात्र पनवेल महापालिका हद्दीत गाड्या वाढविणे ही आमची प्राथमिक जबाबदारी नसून, नवी मुंबई पालिका हद्दीत बस सेवा सुरळीत ठेवण्याला आम्ही प्राथमिकता देत असल्याचे मत एनएमएमटी प्रशासनाचे महाव्यवस्थापक योगेश कडूसकर यांनी व्यक्त केल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय सध्या तरी दूर होण्याची शक्यता धुसर झाली आहे.

Bomb threat: दिल्लीनंतर आता मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बची धमकी, संपूर्ण कॅम्पस रिकामा

पालिकेच्या स्थापने पूर्वीपासून नवी मुंबई पालिकेच्या परिवहन विभागाकडून पनवेल परिसरातील सिडकोने विकसित केलेला भाग आणि इतर विभागात सार्वजनिक परिवहन सेवे मार्फत बस सेवा पुरवली जात आहे.सध्या एनएमएमटी मार्फत पनवेलमधील 23 वेगवेगळ्या मार्गिकांवर बस सेवा पुरवली जात आहे. ही सेवा पुरवन्यासाठी एनएमएमटी विभागाला मोठा तोटा सहन करावा लागत असल्याची माहिती एनएमएमटी विभागाकडून देण्यात आली आहे.2016 साली स्थापित पनवेल पालिकेची स्वतःची परिवहन सेवा नसल्याने नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेला होणारा तोटा भरून काढण्यात पनवेल पालिकेने हातभार लावावा असे म्हणणे एनएमएमटी प्रशासनाचे आहे. पनवेल पालिकेशी या बाबत पत्रव्यवहार करण्यात आला असल्याची माहिती एनएमएमटी अधिकाऱ्यांनी दिली आहे. पनवेल पालिकेकडून मात्र अद्यापही कोणतेही सहकार्य करण्यात आलेले नसल्याने पनवेल पालिका हद्दीतील बस संख्येत घट करून नवी मुंबई पालिका हद्दीत बस सेवा सुरळीत ठेवण्याला प्राधान्य दिले जात असल्याची माहिती एनएमएमटी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

स्वतंत्र परिवहन सेवेसाठी पनवेल पालिकेचे प्रयत्न

2016 साली घोषित पनवेल पालिकेची स्वतःची परिवहन सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.या करता अहवाल तयार करण्यासाठी एजन्सीची नियुक्ती पालिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. एजन्सी कडून आलेल्या अहवाला नंतर एनएमएमटी विभागाला होणारी तूट भरून द्यायची,आणि ती किती द्यायची याचा निर्णय घेणे शक्य होणार असल्याचे मत पनवेल पालिकेच्या आशिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

एनएमएमटी अधिकाऱ्यांशी साधणार संपर्क

खानदेश वर रेल्वे स्थानक ते पनवेल रेल्वे स्थानक दरम्यान धावणाऱ्या बस सेवेवर परिणाम झाला असल्यास या बाबत एन एम एम टी च्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

नवी मुंबई पालिका हद्दी बस सेवा नियमित ठेवण्याची प्राथमिक जबाबदारी आमची आहे.त्या मुळे तसे प्रयत्न आम्ही करत आहोत. पनवेल पालिका हद्दीत बस सेवा पुरवण्यासाठी होणारा तोटा भरून काढण्यात पनवेल पालिकेने सहकार्य करावे जेणे करून बस सेवा पूर्ववत करणे आम्हांला देखील सोयीचे होईल.
– योगेश कडूसकर,महाव्यवस्थापक. एन एम एम टी.

बस सेवे साठी होत असलेला तोटा भरून काढण्यासाठी काही रक्कम पनवेल पालिकेने द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे.स्वतःची परिवहन सेवा सुरु करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरु आहेत.या करता एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. एजन्सी कडून अहवाला प्राप्त होताच एनएमएमटी विभागाला होणारी तूट भरून द्यायची,आणि ती किती द्यायची याचा निर्णय घेणे शक्य होणार आहे, असं पनवेल पालिका परिवहन व्यवस्थापक अधिकारी कैलास गावडे यांनी सांगितलं आहे.

Mira Bhayander : RMC प्लांट बंद करा; डंपरमुळे झालेल्या अपघाताने नागरिकांची प्रशासनाविरोधात घोषणाबाजी

Web Title: Navi mumbai passengers are being obstructed by nmmt passengers are inconvenienced on the panvel railway station route

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 03:59 PM

Topics:  

  • bus
  • Navi Mumbai
  • panvel

संबंधित बातम्या

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे घणसोली रस्त्याचे काम रखडले; आयुक्तांनी लक्ष घालण्याची मागणी
1

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे घणसोली रस्त्याचे काम रखडले; आयुक्तांनी लक्ष घालण्याची मागणी

Navi Mumbai : कॅन्सर नोंदणी सुरू करणारी पहिली महानगरपालिका ; नवी मुंबई मनपाची आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी केलं कौैतुक
2

Navi Mumbai : कॅन्सर नोंदणी सुरू करणारी पहिली महानगरपालिका ; नवी मुंबई मनपाची आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी केलं कौैतुक

एपीएमसी पोलीस ठाण्याकडून सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाचे आयोजन, हजारो नागरिकांचा सहभाग
3

एपीएमसी पोलीस ठाण्याकडून सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाचे आयोजन, हजारो नागरिकांचा सहभाग

Navi Mumbai : वाहतूक कोंडीने वाजविले तीन तेरा! पालिका आणि पोलीस प्रशासनाच शहरातील वाहतूक नियोजन फक्त कागदावरच
4

Navi Mumbai : वाहतूक कोंडीने वाजविले तीन तेरा! पालिका आणि पोलीस प्रशासनाच शहरातील वाहतूक नियोजन फक्त कागदावरच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.