मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची संपत्ती ईडीने (ED)नं जप्त केली आहे. (Nawab Malik Property Seized ByED) कुर्ला येथील गोवावाला कंपाऊंड आणि वांद्रे येथील ही संपत्ती जप्त केली आहे. यासोबतच उस्मानाबादमधील संपत्तीतीही जप्त केल्याची माहिती आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मलिक यांना अटक करण्यात आली असून त्यांना न्याायलयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. ईडीने जप्त केलेल्या संपत्तीचा आकडाही खूप मोठा आहे. हा आकडा कोट्यवधींच्या घरात गेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नवाब मलिकांच्या अटकेवरून राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरू होते. ही अटक केवळ दबाव आणण्यासाठी आहे, असा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत होता.
[read_also content=”विद्यार्थ्यांना आता एकाचवेळी दोन अभ्यासक्रम करण्यास परवानगी, UGC चा महत्वाचा निर्णय https://www.navarashtra.com/maharashtra/students-are-now-allowed-to-take-two-courses-at-the-same-time-an-important-decision-of-ugc-nrps-268401.html”]