Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांचं थेट PM नरेंद्र मोदी आणि CM फडणवीसांना पत्र; पत्रात नक्की काय? वाचा सविस्तर

नाराजीच्या या वातावरणात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Dec 19, 2024 | 09:06 PM
छगन भुजबळ यांचं थेट PM नरेंद्र मोदी आणि CM फडणवीसांना पत्र; पत्रात नक्की काय, वाचा सविस्तर

छगन भुजबळ यांचं थेट PM नरेंद्र मोदी आणि CM फडणवीसांना पत्र; पत्रात नक्की काय, वाचा सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

नाराजीच्या या वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे छगन भुजबळ नाराज आहेत. याबाबत नाशिकमध्ये समता परिषदेचा मेळावा घेऊन भूमिका मांडली.ते भाजपमध्ये जाणार असल्याच्याही चर्चा असताना मोदी आणि फडणवीसांना पत्र लिहिल्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.

राजीनामा दिला पण सांगितलं नाही

“मी आमदार होणं किंवा मंत्री होणं हे माझं काम नाही आणि मला मंत्रिपदाची हाव असती तर मी १६ नोव्हेंबरला राजीनामा देऊन १७ नोव्हेंबरला आलो नसतो. मी राजीनामा दिला होता पण उल्लेख केला नाही कारण मला तसे फोन सारखे येत होते. मी राजीनामा दिला होता हे मी अडीच महिन्यांनी सांगितलं.मात्र प्रश्न फक्त मंत्रिपदाचा नाही तर अस्मितेचा आहे. एखाद्या समाजाला बरोबर घेऊन लढणारी माणसं आपल्याकडे आहेत. कुणीही दुःखात राहण्याचं कारण नाही असं म्हणत त्यांनी, कभी डर न लगा मुझे फासला देखकर, मै बढता गया रास्ता देख कर, खुदही खुद नजदिक आती गयी मंजिल मेरा बुलंद हौसला देखकर”, अशी शायरी आज एका मुलाखतीत बोलून दाखवली होती. त्यानंतर आता त्यांनी फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.

पत्रात नेमकं काय?

लाल कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे राज्यातील कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी आपण देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, केंद्रीय वाणिज्यमंत्री मा. पीयूषजी गोयल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तर महाराष्ट्रातील कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क माफ करण्यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करावी, अशी मागणी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

लाल कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे राज्यातील कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी आपण देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, केंद्रीय वाणिज्यमंत्री मा. पीयूषजी गोयल यांच्याकडे पत्राद्वारे… pic.twitter.com/NOy3XdieS6

— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) December 19, 2024

कांद्याच्या भावाचा परिणाम हा शेतकऱ्यांच्या जीवन मरणाशी निगडीत असून वेळोवेळी कांद्याच्या किमान निर्यात दरातील वाढीचा किंवा निर्यातबंदीचा जिल्ह्यातील कांदा निर्यातीवर विपरीत परिणाम होत आहे. आपल्या येवला मतदारसंघातील लासलगावमध्ये आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असून येथून मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होते. सद्यस्थितीत उन्हाळ कांद्याचे उत्पादन संपले असून लाल कांद्याची बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आवक होत आहे, मात्र कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीतया आहे. आधीच बिगरमोसमी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे त्रस्त असताना आता उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. लाल कांदा टिकाऊ नसल्याने तात्काळ विक्री करावी लागते, हेही नुकसानीचे महत्वाचे कारण आहे.

त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी, राज्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळणे गरजेचे असून राज्यात उत्पादित लाल कांद्याची परदेशात जास्तीत जास्त निर्यात होणे आवश्यक आहे. त्यासाठी २० टक्के निर्यात शुल्क हटविणे गरजेचे आहे. तसेच श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयातशुल्क २० टक्क्यांनी कमी करुन अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरु केले आहे.

त्यामुळे नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशांमध्ये निर्यात करता यावा यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील २० टक्के निर्यातशुल्क तातडीने माफ करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आपण केली आहे. आपल्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळून लवकरच आपल्या बळीराजाला दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Ncp leader chhagan bhujbal write letter to cm devendra fadnavis and pm narendra modi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 08:33 PM

Topics:  

  • Chhagan Bhujbal
  • CM Devendra Fadnavis
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप
1

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण
2

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत
3

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ
4

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.