Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रवादीचा बडा नेता जरांगेंच्या भेटीला; मध्यरात्री काय झाली चर्चा?

मनोज जरांगे यांचे उपोषण आणखी काही काळ सुरू राहिल्यास मराठा आंदोलक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहेत. त्यातच राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास 20  दिवस आहेत. त्यामुळे मराठा आंदोलनाच्या दृष्टीने हे दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 25, 2024 | 12:26 PM
राष्ट्रवादीचा बडा नेता जरांगेंच्या भेटीला; मध्यरात्री काय झाली चर्चा?
Follow Us
Close
Follow Us:

जालना: आंतरवली सराटीतून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांनी  मनोज जरांगे यांची भेट घेतल्याची माहिती आहे. बुधवारी (24 सप्टेंबर) मध्यरात्री राजेश टोप अचानक आंतरवली सराटीत पोहोचले. स्टेजवर मनोर जरांगे यांच्यापाशी जाऊन बसले. दोघांमध्येही  काही वेळ चर्चाही झाली. पण नेमकी काय चर्चा  झाली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर  आलेली नाही. त्यानंतर राजेश टोपेंनी मनोज जरांगे यांच्यासहकाऱ्यांशीही चर्चा केली. त्यानंतर  काही वेळाने ते निघूनही गेले. पण त्यांच्याया  भेटीमुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास राजेश टोपे यांनी आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली.  गेल्या दोन दिवसांपासून जरांगेंची प्रकृती खालावल्य़ामुळे राजेश टोपे यांनी त्यांना उपचार घेण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीनंतर मध्यरात्री मनोज जरांगेंनी  उपचार घेतले.

हेही वाचा: World Pharmacist Day 2024 : जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त जाणून घ्या महत्त्व आणि थीम

दरम्यान,मनोज जरांगेयांच्या उपोषणाचा आज नववी दिवस आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने उपोषण केल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. हे त्यांचे सहावे उपोषण आहेत. जरांगे यांचा रक्तदाब सातत्याने वरखाली होत आहे. अशक्तपणामुळे त्यांना चालण्यात आणि बसण्यातही अडचणी येत आहेत.  शरीरातील पाण्याची पातळीही कमी झाली आहे. त्यांना चक्कर येत आहेत. तरीही त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान, तीन-चार दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील मनोज जरांगे यांची उपोषण स्थळी त्यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या काही झाल्यास त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल, असा इशारा माजी  मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. त्याचबरोबर मनोज जरांगे यांचे उपोषण आणखी काही काळ सुरू राहिल्यास मराठा आंदोलक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहेत. त्यातच राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास 20  दिवस आहेत. त्यामुळे मराठा आंदोलनाच्या दृष्टीने हे दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.

हेही वाचा:8 वर्षांचा संसार आता मोडणार! अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तर यांचा घटस्फोट?

 

Web Title: Ncp senior leader met manoj jarang on wednesday midnight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2024 | 10:10 AM

Topics:  

  • Nationalist Congress Party
  • rajesh tope

संबंधित बातम्या

Raigad : बिनविरोध विजयाची कमान राष्ट्रवादीकडे! वसुधा पाटीलांचा बिनविरोध विजय ठरला चर्चेचा विषय
1

Raigad : बिनविरोध विजयाची कमान राष्ट्रवादीकडे! वसुधा पाटीलांचा बिनविरोध विजय ठरला चर्चेचा विषय

Sharad Pawar : “काँग्रेस लवकरच फुटेल…”, बिहार निकालानंतर पंतप्रधानांच्या भविष्यवाणीवर शरद पवारांचे मोठे विधान
2

Sharad Pawar : “काँग्रेस लवकरच फुटेल…”, बिहार निकालानंतर पंतप्रधानांच्या भविष्यवाणीवर शरद पवारांचे मोठे विधान

Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल
3

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन
4

Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.