Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तरणाबांड आमदार विधानसभेत विरोधकांना घाम फोडणार; शरद पवारांनी दिली ‘ही’ मोठी जबाबदारी

Maharashtra Assembly: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून निवडून आलेले देशातील सर्वात तरुण आमदार रोहित पाटील यांच्यावर पक्षाने अधिकची जबाबदारी टाकण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 03, 2024 | 02:30 PM
तरणाबांड आमदार विधानसभेत विरोधकांना घाम फोडणार ; शरद पवारांनी दिली 'ही' मोठी जबाबदारी

तरणाबांड आमदार विधानसभेत विरोधकांना घाम फोडणार ; शरद पवारांनी दिली 'ही' मोठी जबाबदारी

Follow Us
Close
Follow Us:

तासगाव:  कवठेमहांकाळचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवा आमदार रोहित पाटील यांची पक्षाच्या विधिमंडळातील मुख्य प्रतोदपदी निवड केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही निवड जाहीर केली. या निवडीमुळे देशातील सर्वात तरुण आमदार रोहित पाटील यांचा आवाज विधानसभेत घुमणार आहे. अत्यंत तरुण वयात पाटील यांच्यावर मुख्य प्रतोदपदाची जबाबदारी टाकल्याने त्यांचे भविष्य उज्ज्वल असल्याचे समर्थकांकडून बोलले जात आहे. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत रोहित पाटील यांनी तासगाव मतदारसंघातून मोठा विजय प्राप्त केला आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत रोहित पाटील यांनी तासगाव –  कवठेमहांकाळ मतदार संघातून बाजी मारली. या मतदारसंघात स्व. आर. आर. पाटील कुटुंबीयांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी, माजी खासदार संजय पाटील हे त्यांच्या विरोधात उभे होते. राज्याचे लक्ष लागून लागलेला राहिलेल्या या निवडणुकीत रोहित यांनी संजय पाटील यांना धूळ चारली. देशातील सर्वात तरुण आमदार होण्याचा मान मिळवला.

दरम्यान, तासगाव – कवठेमहांकाळमध्ये महाविकास आघाडीचा आमदार झाला असला तरी राज्यात मात्र महाविकास आघाडीचा सुफडासाफ झाला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस या तिन्ही पक्षांना मिळून ६० उमेदवारही निवडून आणता आले नाहीत. त्यामुळे या विधानसभेत विरोधी पक्षनेता असेल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

आबांचे चिरंजीव म्हणून नावाभोवती ग्लँमर
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून निवडून आलेले देशातील सर्वात तरुण आमदार रोहित पाटील यांच्यावर पक्षाने अधिकची जबाबदारी टाकण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. विधिमंडळातील पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी त्यांची निवड केली. या निवडीमुळे तासगाव – कवठेमहांकाळमधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. परंपरागत प्रतिस्पर्धी माजी खासदार संजय पाटील यांना चितपट करून त्यांनी विधानसभेत धडाकेबाज ‘एन्ट्री’ केली आहे. आर. आर. पाटील यांचे चिरंजीव म्हणून राज्यभर त्यांच्या नावाभोवती ‘ग्लॅमर’ आहेच. मात्र आता देशातील सर्वात तरुण आमदार म्हणून रोहित पाटील यांचा देशभर नावलौकिक होत आहे.

‘राष्ट्रवादी’कडून तरुण आमदारांना पुढे आणण्याचा प्रयत्न

अत्यंत नम्र, अभ्यासू, कोणत्याही गोष्टीचा खोलात जाऊन माहिती घेण्याचा स्वभाव, वक्तृत्व कौशल्य, साधी राहणी – उच्च विचारसरणी यामुळे रोहित पाटील यांच्याकडे नेहमीच सर्वांचा ‘फोकस’ असतो. आता ते राज्याच्या विधानसभेत काम करताना दिसणार आहेत. वय कमी असले तरी अभ्यासू वृत्तीमुळे विधानसभेत ते विरोधी बाकावर बसूनही आपला आवाज घुमवतील, यात शंका नाही. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रोहित पाटील यांची पक्षाच्या विधिमंडळातील मुख्य प्रतोदपदी निवड केली. त्यांच्यावर आता पक्षाने अधिकची जबाबदारी टाकली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून तरुण आमदारांना पुढे आणून आगामी काळात त्यांना राज्याचे भविष्य बनविले जात असल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे.

Web Title: Ncp sharad pawar give responsebility to mla rohit patil for pratod post at maharashtra assembly 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2024 | 02:27 PM

Topics:  

  • NCP Sharad Pawar
  • Rohit Patil
  • Tasgaon

संबंधित बातम्या

‘शेतकऱ्यांच्या अश्रूंवर सरकारचे राजकारण’ तासगावातून रोहित पाटीलांचा थेट हल्लाबोल
1

‘शेतकऱ्यांच्या अश्रूंवर सरकारचे राजकारण’ तासगावातून रोहित पाटीलांचा थेट हल्लाबोल

शेतकऱ्यांच्या नुकसानीवरुन रोहित पाटील आक्रमक, उद्या तासगावात लाक्षणिक उपोषण; नेमकं काय आहेत मागण्या?
2

शेतकऱ्यांच्या नुकसानीवरुन रोहित पाटील आक्रमक, उद्या तासगावात लाक्षणिक उपोषण; नेमकं काय आहेत मागण्या?

पाऊस ओसरताच आजारांचा फैलाव; ‘या’ तालुक्यात ताप, डेंग्यू, मलेरिया, सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले
3

पाऊस ओसरताच आजारांचा फैलाव; ‘या’ तालुक्यात ताप, डेंग्यू, मलेरिया, सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले

सावळजमध्ये राजकीय खळबळ; माजी सरपंच- उपसरपंचासह 4 सदस्यांनी दिला राजीनामा
4

सावळजमध्ये राजकीय खळबळ; माजी सरपंच- उपसरपंचासह 4 सदस्यांनी दिला राजीनामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.