sharad pawar and ajit pawar
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगामध्ये उत्तर दाखल करण्यात आलेले असून, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फुटलेला नसून शरद पवार यांच्याच नेतृत्वाखाली पदाधिकारी काम करतात, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काका-पुतण्यातील राजकारणाबद्दल चर्चा होत आहेत.
शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल
अजित पवार गटाच्या याचिकेसंदर्भात ७ सप्टेंबरला शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल करण्यात आलेले आहे. त्यात म्हटले की, वैयक्तिक स्वार्थासाठी काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे. पक्षामध्ये कसलीही फूट पडलेली नाही. अजित पवार यांनी घेतलेली भूमिका विरोधाभासी असल्याचेही उत्तरात म्हटलेले आहे.
राष्ट्रवादीने पत्रामध्ये काय म्हटलेय
अजित पवार गटाच्या दाव्यांना कोणताही कायदेशीर अथवा भौतिक आधार नाही. काही लोकांनी वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्ष अजूनही एकसंध असून, शरद पवार यांच्या पाठीशी उभा आहे. निवडणूक आयोग आपले कर्तव्य निःपक्षपातीपणे पार पाडेल, असादेखील विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे.
शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल
अजित पवार गटाने केलेल्या दाव्यावर शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल करण्यात आलेलं आहे. मात्र शरद पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या उत्तराने खरा पक्ष नेमका कुणाचा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर अजित पवारांनी आयोग पारदर्शकपणे निर्णय घेईल, असं म्हटलं आहे.