Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Election : ‘पुतळा नाही तर महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला’; त्या घटनेवरून अमोल कोल्हेंचा महायुतीवर घणाघात

काही महिन्यांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता. त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही उमटत आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Nov 11, 2024 | 08:28 PM
त्या घटनेवरून अमोल कोल्हेंचा महायुतीवर घणाघात

त्या घटनेवरून अमोल कोल्हेंचा महायुतीवर घणाघात

Follow Us
Close
Follow Us:

काही महिन्यांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता. त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही उमटत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे यांनीही आज या पुतळ्यावरून महायुतीवर जोरदार हल्ला चढवला. शिवाजी महाराजांचा केवळ पुतळा कोसळला नाही तर महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला, असा घणाघात त्यांनी केला.

हेही वाचा-Manipur Attack : मणिपूरमध्ये उग्रवाद्यांचा CRPF कॅम्प, पोलीस ठाण्यावर हल्ला; घरं पेटवली, ११ ठार

महाराजांनी सुरत लुटली ती सिंधुदुर्गचा किल्ला उभारण्यासाठी पण…

शाहिस्तेखानाने कित्येक महिने स्वराज्यात ठाण मांडून होता, त्याने स्वराज्यात लूट माजवली होती. त्याचा वचपा काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली आणि एकदा नाही तर दोनवेळा सुरत लुटली. सुरतेच्या लुटीतून मिळालेल्या खजिना सिंधुदुर्गातील कुरटे बेटावर किल्ला उभारण्यासाठी महाराजांनी वापरला. सुरत लुटून महाराजांनी सिंधुदुर्गचा किल्ला उभारला मात्र देवेंद्र फडणवीस वेगळा इतिहास सांगतात.

महाराजांनी सुरत लुटून सिंधुदुर्गात किल्ला उभारला. आता इतिहास बदलला. दिल्लीतील गुजरात्यांनी महाराष्ट्राचे रोजगार लुटले. मात्र सिंधुदुर्गातील किल्ल्यात भ्रष्टाचार झाला तेव्हा तो महाराजांना सुद्धा रुचला नाही. पुतळा कोसळला. हा केवळ पुतळा कोसळला नाही तर महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला. त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाने या घटनेचा महायुती सरकारला जाब विचारला पाहिजे, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा-Uddhav Thackeray : यवतमाळमध्ये उद्धव ठाकरेंच्या बॅगांची झडती; निवडणूक अधिकाऱ्यांवर ठाकरे कडाडले, Video ही काढला

नेमकं काय घडलं होतं

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा भव्य पुतळा उभारण्यात आला होता. राजकोट किल्ल्यावरील या पुतळ्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होतं. 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनानिमित्त या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. मात्र 26 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळला. अवघ्या 8 महिने 22 दिवसांत शिवरायांचा हा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींमधून तीव्र शब्दात संताप व्यक्त करण्यात आला होता. विरोधकांकडून महायुती सरकारला धारेवर धरण्यात आलं होतं.

उतळा उभारणाऱ्या आरोपीलाही ताब्यात घेण्यात आलं. त्यावेळी सरकारडून वाऱ्याचा वेग असल्यामुळे पुतळा कोसळल्याचं कारण देण्यात आलं होतं. सरकारने दिलेल्या या कारणावरून तर राज्यभरातून त्यांच्यावर अधिकच टीकेची झोड उठली होती. देशपातळीवर हा मुद्दा उपस्थित झाला होता. विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता.

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरू असून त्याचे पडसाद आता निवडणुकीच्या प्रचारातही उमटत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे यांनी आज या पुतळ्यावरून महायुतीवर जोरदार टीकास्त्र सोडलं. शिवाजी महाराजांचा केवळ पुतळा कोसळला नाही तर महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला, असा घणाघात त्यांनी केला आहे.

Web Title: Ncp sharad pawar group mp amol kolhe criticised mahayuti on rajkot shivaji maharaj statue collapse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2024 | 07:47 PM

Topics:  

  • amol kolhe
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

दौंडकरांचे लोकलचे स्वप्न भंगले! उपनगरी दर्जाच्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाकडून नकार
1

दौंडकरांचे लोकलचे स्वप्न भंगले! उपनगरी दर्जाच्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाकडून नकार

Amol Kolhe On Girish Mahajan भडकावू आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या गिरीश महाजनांनी भान राखावं NCP
2

Amol Kolhe On Girish Mahajan भडकावू आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या गिरीश महाजनांनी भान राखावं NCP

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?
3

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.