यवतमाळमध्ये उद्धव ठाकरेंच्या बॅगांची झडती
विधानसभा निवडणुकीच्या प्रचासाठी आज उद्धव ठाकरे यवतमाळ जिल्ह्यात आहेत. दरम्यान वणी येथे प्रचारसभेसाठी जात असताना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या बगची झडती घेतली. त्यामुळे संतापलेल्या ठाकरेंनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलं आणि नंतर प्रचारसभेतही चांगलाच समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी याचा स्वत: व्हिडिओही शूट केला आहे.
हेही वाचा-Israel-hezbollah War: हिजबुल्लाह कमांडर सलीम इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार; इराणचा तीव्र निषेध
गेल्या चार महिन्यात फक्त बॅग तपासण्यासाठी मीच सापडलो का? नरेंद्र मोदी, अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगा का तपासल्या नाहीत आजपर्यंत? असा सवाला उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना केला. मी तुमच्या कामात अडथळा आणणार नाही, मात्र सर्व पक्षांच्या नेत्यांची झडती घ्या. पण या निवडणुकीत नरेंद्र मोदी, अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याही बॅगा तपासल्याचे व्हिडिओ समोर आले पाहिजेत, असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे उद्धव ठाकरे आज सभेसाठी गेले होते. हेलिपॅडवर उद्धव ठाकरे यांचं हेलिकॉप्टर उतरलं होतं. यावेळी निवडणूक अधिकारीही तिथे आधीच उपस्थित होते. त्यांनी ठाकरेच्या बॅगांची तपासणी केली. ठाकरेंच्या बॅगा तपासतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॅगा तपासणाऱ्या अधिकाऱ्यांवर ठाकरेंनी प्रश्नांचा अक्षरश:भडिमार केला. अधिकाऱ्यांचं नाव-गाव आणि कोणत्या विभागात काम करतात हेही विचारलं.
शिवाय नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगांची तपासणी केली का? असा सवाल यावेळी ठाकरेंनी अधिकाऱ्यांना केला. ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली. ठाकरेंच्या प्रश्नाला निवडणूक अधिकाऱ्यांकडे कोणतेही उत्तर नसल्याचे व्हिडीओतून दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरे दिसत नाहीत, पण त्यांचा आवाज ठळकपणे ऐकू येते आहे. ते स्वत:याचा व्हिडिओ काढल्याचं बोललं जात आहे.
नंतर वणी झालेल्या प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. नरेंद्र मोदी महाराष्ट्रात सभेसाठी आल्यावर सर्व रस्ते बंद केले जातात. पण मोदी असो वा अमित शाह, फडणवीस असोत वा अजित पवार यांच्या बॅगा कधी तपासल्या का? त्या तपासल्या जाणार नसतील तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आता त्यांच्या बॅगा तपासतील. पण पोलिसांनी मधे यायचं नाही. निव़डणूक अधिकाऱ्यांनीही मधे यायच नाही, आमच्या बॅग तपासण्याचा जसा तुम्हाला अधिकार आहे तसाच प्रचाराला जो कोणी येईन, त्याची बॅग तपासण्याचा अधिकारही मतदारांना आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. म्हटलं आहे.