Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nellore Cow : कोण म्हणतंय कृषीपुरक व्यवसांयामध्ये पैसा नाही! पठ्ठ्याने ४० कोटीला विकली गाय, भारतातील या राज्यात होते पैदास

एका भारतीय जातीच्या गायीने लिलावात जगातील सर्वात महागडी गाय होण्याचा नवा विक्रम प्रस्थापित करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. ब्राझीलमधील मिनास गेराईस येथे झालेल्या लिलावात ही गाय ४० कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 06, 2025 | 09:35 PM
कोण म्हणतंय कृषीपुरक व्यवसांयामध्ये पैसा नाही, पट्ट्याने ४० कोटीला विकली गाय, भारतातील या राज्यात होते पैदास

कोण म्हणतंय कृषीपुरक व्यवसांयामध्ये पैसा नाही, पट्ट्याने ४० कोटीला विकली गाय, भारतातील या राज्यात होते पैदास

Follow Us
Close
Follow Us:

40 Crore Cow  : एका भारतीय जातीच्या गायीने लिलावात जगातील सर्वात महागडी गाय होण्याचा नवा विक्रम प्रस्थापित करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. ब्राझीलमधील मिनास गेराईस येथे झालेल्या लिलावात ही गाय ४० कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली. या नेल्लोर जातीच्या गायीचे नाव व्हिएटिना-१९ आहे. या गायीचे वजन ११०१ किलो आहे, जे तिच्या त्याच जातीच्या इतर गायींच्या सरासरी वजनाच्या दुप्पट आहे. ही गाय ४.८ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ४० कोटी रुपये) ला खरेदी करण्यात आली आणि त्यामुळे ती जगातील सर्वात महागडी गाय ठरली आहे.

मोफत रेशन घेणाऱ्यांवर आता Income Tax ची करडी नजर, ‘या’ यादीत नाव असेल तर गहू-तांदळालादेखील मुकणार

पार्टनर इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, व्हिएटिना-१९ ही काही सामान्य गाय नाही. जगातील दुर्मिळ वानांपैकी एक आणि शरीरयष्टीमुळे त्याला जागतिक मान्यता मिळाली आहे. या गायीला प्रतिष्ठित चॅम्पियन्स ऑफ द वर्ल्ड स्पर्धेत मिस साउथ अमेरिकाचा किताबही मिळाला आहे. या गायीच्या वैशिष्ट्यामुळे, जगात मोठी मागणी आहे. जगभरातील पशुपालन कार्यक्रमांना चालना देण्यासाठी या गायीची वासरं जगभर निर्यात केली जातात.

आंध्र प्रदेशातील या भागात होते पैदास

या नेल्लोर जातीच्या गायीला भारतात ओंगोल जातीची गाय म्हणूनही ओळखलं जातं. भारतातील आंध्र प्रदेशातील ओंगोल प्रदेशात जन्मलेल्या या गायीमंध्ये अतिउष्णतेचा सामना करण्याची क्षमता असते. मजबूत रोग प्रतिकारशक्तीमुळे या गायींना आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील उष्णकटिबंधीय आणि अतिउष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये  मोठं महत्त्व आहे.

उष्ण वातावरणात टिकून राहण्याची क्षमता

या जातीला खास बनवणारी गोष्ट म्हणजे, या गायीची जास्त काळजी घेण्याची गरज लागत नाही. तसंच या गायीची शारीरिक रचना तिला अधिक आकर्षक बनवते. आकर्षक शुभ्र पांढऱ्या रंगाची त्वचा , आकर्षक कुबड आणि सैल त्वचा यामुळे ही गाय सुंदरच दिसत नाही तर उष्णतेशी लढण्यासाठी देखील सज्ज असते. सैल त्वचा उष्णता नष्ट करण्यास मदत करते, तर कुबड चरबी साठवते, ज्यामुळे अन्नटंचाईच्या काळात गाय स्वतःचे पोषण करू शकते.

Shantanu Naidu : मोठी बातमी! रतन टाटांचा तरुण मित्र शंतनू नायडूला मिळाली मोठी जबाबदारी, सोशल मीडियावर भावनिक पोस्ट

व्हिएटिना-१९ ची विक्री नेल्लोर जातीची वाढती मागणी दर्शवते. १८०० च्या दशकात ब्राझीलमध्ये या जातीच्या गायी पहिल्यांदा आणण्यात आल्या. तिच्या प्रभावी स्नायूंच्या बांधणीमुळे आणि उच्च प्रजननक्षमतेमुळे, या गायीने ब्राझीलमध्ये पशुधन उत्पादकता वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Web Title: Nellore cow world most expensive indian breed nellore cow sold 40 crore rupees in brazil know about andhra breed cow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2025 | 07:58 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • cow news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.