Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साडीप्रेमींसाठी पर्वणी – न्यू वेव्ह पैठणी फेस्टिव्हलचं सायली संजीवच्या हस्ते उद्धाटन

सायली संजीव म्हणाली, पैठणी तर मला आधीपासूनच आवडायची परंतु माझ्या येणाऱ्या नवीन सिनेमामुळे मी तिच्या अजून नव्याने प्रेमात पडले. इथे असलेली कोणतीही पैठणी बघा त्यात किती वेगळ्या नक्षी असूदेत ती तुम्हाला प्रेमात पाडतेच. या फेस्टिवलमध्ये वेगवेगळ्या राज्यातील साड्या आहेत त्यात त्यांचं स्वतःच वैशिष्ट्य आहे.

  • By साधना
Updated On: Oct 12, 2022 | 07:15 PM
sayali sanjeev at paithani festival

sayali sanjeev at paithani festival

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: येवला हे पैठणीचे (Paithani) माहेरघर आहे. मात्र कोरोना काळात याच माहेरवाशिणीला मदत मिळणे मुश्कील झाले होते. त्याचा परिणाम येवल्यातील विणकरांच्या व्यापारावरच नव्हे तर उपजीविकेवर झाला. वर्षानुवर्षे उत्पादन केंद्र असलेल्या येवला शहराचा व्यापार ठप्प झाला. त्यामुळे अस्सल पैठणी साडी ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी दोन वर्षांच्या कालावधीनंतर ‘न्यू वेव्ह पैठणी फेस्टिव्हल’ (New Wave Paithani Festival) आणि ‘न्यू वेव्ह पैठणी बीस्पोक’ (New Wave Paithani Bespoke)  ला आजपासून सुरुवात झाली. अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev), दिग्दर्शक शंतनू रोडे आणि फेस्टिव्हलच्या दिग्दर्शका सन्निधा भिडे यांच्या हस्ते या फेस्टिव्हलचे दादरच्या रवींद्र नाट्य मंदिरात उद्धाटन झाले.

यावेळी सायली संजीव म्हणाली “पैठणी तर मला आधीपासूनच आवडायची परंतु माझ्या येणाऱ्या नवीन सिनेमामुळे मी तिच्या अजून नव्याने प्रेमात पडले. इथे असलेली कोणतीही पैठणी बघा त्यात किती वेगळ्या नक्षी असूदेत ती तुम्हाला प्रेमात पाडतेच. या फेस्टिवलमध्ये वेगवेगळ्या राज्यातील साड्या आहेत त्यात त्यांचं स्वतःच वैशिष्ट्य आहे. सर्वात महत्वाच म्हणजे इथे सगळ्या राज्यातील कारागिरांना संधी दिली जाते. मी आवर्जून सांगते की न्यू वेव्ह पैठणी फेस्टिव्हलला नक्की भेट द्या”.

न्यू वेव्ह पैठणी च्या डायरेक्टर सन्निधा भिडे म्हणतात, “कोविड १९चा प्रादुर्भाव झाल्यापासून हातमाग विणकरांना मोठ्या प्रमाणावर कामाचे नुकसान झाले आणि बहुतेक विणकरांना त्यांचे काम बदलावे लागल्या मुळे येवला विभागातील अस्सल पैठणी साडीच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. या सणासुदीच्या हंगामात आम्ही पुन्हा वार्षिक बाजाराची परंपरा पुढे चालू ठेवू शकलो याचा आम्हाला आनंद आहे. यावर्षी, येवला विणकरांच्या मदतीने आम्ही विणकर कुटुंबांना ‘न्यू वेव्ह पैठणी बीस्पोक’ ची संकल्पना मांडत आहेत. जी वर्षभर लाभ देणारी असेल. जेणेकरून ग्राहकांना आता कस्टमाइज पैठणी साड्यांची निवड करता येईल. ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार रंग ,नक्षीकाम, इतर  सगळ्याची निवड करून फेस्टिवल दरम्यान मागणी नोंदवता येईल. ग्राहकांना १५० वेगवेगळ्या प्रकारच्या पैठण्या पाहायला मिळतील. या सगळ्या पैठण्या अस्सल दर्जाच्या असून त्यांची किंमत १५००० हजार पासून ते ३.५ लाखपर्यंत असणार आहे. ”

यावर्षी लग्नसराई, दिवाळी, नवीन ट्रेंड या सगळ्या गोष्ठी लक्ष्यात ठेवून ‘न्यू वेव्ह शॉपिंग फेस्टिव्हल’ अंतर्गत देशभरातील ४० विविध विणकरांना एकत्र घेऊन चंदेरी, माहेश्वरी, जामदनी, बनारसी, कांथा, कोसा, साउथ सिल्क, राजस्थानमधील रिअल कोटा डोरिया साड्या, पश्चिम बंगालमधील बलूचारी साड्या यासारख्या विविध हातमागावरील साड्या उपलब्ध असून राजस्थानी रजया, काश्मीरमधील रिअल पश्मिना शॉल्स , साऊथचे दागिने आणि बरेच काही. पैठणी जॅकेट, पुणेरी पगडी, आकाशकंदील, मोजडी अशा पैठणी मटेरिअलपासून बनवलेल्या अनेक वैविध्यपूर्ण वस्तू प्रदर्शित करण्यात येणार आहेत. डिझायनर साड्या आणि ब्लाउज, ऑरगॅनिक सौंदर्य प्रसाधने आहेत. लक्ष्य आर्ट फाऊंडेशन आणि आधार सारख्या एनजीओना त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन करण्यासाठी मोफत स्टॉलसुद्धा बघायला मिळतील.

Web Title: New wave paithani festival in dadar nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2022 | 07:09 PM

Topics:  

  • sayali sanjeev

संबंधित बातम्या

स्वतःचे आकाश शोधायला निघालेल्या ‘कैरी’ची गोष्ट, रोमँटिक; थ्रिलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
1

स्वतःचे आकाश शोधायला निघालेल्या ‘कैरी’ची गोष्ट, रोमँटिक; थ्रिलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.