Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वतःचे आकाश शोधायला निघालेल्या ‘कैरी’ची गोष्ट, रोमँटिक; थ्रिलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

दिग्दर्शक शंतनू रोडे पॉवरपॅक्ड  कलाकारांना ‘कैरी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 14, 2025 | 05:46 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

आजकाल कोणत्या सिझनला काय काय बदल होतील सांगता येत नाही. हिवाळ्यात पाऊस, पावसाळ्यात गरमी हे सार सुरुच आहे. इतकंच काय आता तर मार्च -मेदरम्यान येणारी कैरीही डिसेंबरमध्ये पाहायला मिळणार आहे. ऐकून तुम्हीही गोंधळात ना?, हो. ‘कैरी’ हा मराठमोळा सिनेमा येत्या १२ डिसेंबरला संबंध महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. नुकतंच या सिनेमाचं पोस्टर समोर आलं असून चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणापासूनच या चित्रपटाची उत्सुकता होती. नॅशनल अवॉर्ड विनिंग दिग्दर्शक शंतनू गणेश रोडे यांचा रोमँटिक थ्रिलर ‘कैरी’ हा सिनेमा येत्या १२ डिसेंबरला  प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातून रोमँटिक थ्रिलर असा नेमका कोणता प्रवास पाहायला मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

‘कैरी’ या चित्रपटात सायली संजीव, सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, शशांक केतकर, अरुण नलावडे, सुलभा आर्या हे कलाकार मुख्य भूमिकेत असल्याचे दिसतंय. दिग्दर्शक शंतनू रोडे पॉवरपॅक्ड  कलाकारांना ‘कैरी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले आहेत. इतकंच नाहीतर या चित्रपटात सायली संजीव आणि सिद्धार्थ जाधव पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

Colors Marathi Serial: नियतीचा खेळ सुरू; ‘आई तुळजाभवानी’ मध्ये जगदंबा आणि महादेव यांची अद्भुत भेट

‘कैरी’ या चित्रपटाची निर्मिती ‘९१ फिल्म स्टुडिओज’ अंतर्गत झाली आहे. या स्टुडिओने बऱ्याच भाषांमध्ये चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यात ‘लोच्या झाला रे’ आणि ‘शेर शिवराज’ या दोन ब्लॉकबस्टर व्यावसायिक अशा मराठी चित्रपटांचा समावेश आहे. तर ‘कैरी’ हा त्यांचा तिसरा सिनेमा आहे. शिवाय ‘कैरी’ हा सिनेमा इन असोसिएशन विथ ‘अमेय विनोद खोपकर एंटरटेंमेंट’चा आहे.  तर ‘कैरी’ चित्रपटाची निर्मिती नवीन चंद्रा, नंदिता राव कर्नाड, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन यांनी केली आहे. तसेच तबरेझ पटेल हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. ‘कैरी’चे लेखन स्वरा मोकाशी यांनी केले आहे. तर चित्रपटाचे छायांकन प्रदीप खानविलकर यांचे आहे. आणि चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी मनीष शिर्के यांनी सांभाळली आहे. तसेच,  चित्रपटाला संगीत दिलंय ‘निषाद गोलांबरे’ आणि ‘पंकज पडघन’ यांनी; तर पार्श्वसंगीत दिलंय ‘साई पियूष’ यांनी.

Indian Idol: शिबानी दांडेकरने केली डोंबिवलीच्या अंशिकाची स्तुती म्हणाली, ”तूच बँड लीडर..”

दिग्दर्शक शंतनू रोडे यांच्या ‘कैरी’ या सिनेमात आपल्याला रोमँटिक थ्रिलर असे कोणते ट्विस्ट अँड टर्न पाहायला मिळणार आहेत याची उत्सुकता या पोस्टरने वाढविली आहे. येत्या १२ डिसेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: The romantic thriller film kairi will soon hit the screens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 05:28 PM

Topics:  

  • marathi movie
  • sayali sanjeev
  • subodh bhave

संबंधित बातम्या

Marathi Movie : गोंधळी बांधवांचा चित्रपटाला पारंपरिक अभिषेक,  ‘गोंधळ’ चित्रपटाच्या टीमसाठी अनोखा सन्मान
1

Marathi Movie : गोंधळी बांधवांचा चित्रपटाला पारंपरिक अभिषेक, ‘गोंधळ’ चित्रपटाच्या टीमसाठी अनोखा सन्मान

धैर्य, चिकाटी आणि प्रेरणेची कहाणी,‘ताठ कणा’ मध्ये दिसणार उमेश आणि दिप्तीची जोडी
2

धैर्य, चिकाटी आणि प्रेरणेची कहाणी,‘ताठ कणा’ मध्ये दिसणार उमेश आणि दिप्तीची जोडी

मराठी मनाचा कन्नड रत्न कविश शेट्टी आफ्टर OLC’मध्ये अवतरणार, चित्रपटातील डॅशिंग, चार्मिंग लूक व्हायरल
3

मराठी मनाचा कन्नड रत्न कविश शेट्टी आफ्टर OLC’मध्ये अवतरणार, चित्रपटातील डॅशिंग, चार्मिंग लूक व्हायरल

Marathi Serial TRP: टीआरपी स्पर्धेत ‘या’ मालिकेने मारली बाजी; जाणून घ्या टॉप 5 मालिकांची यादी
4

Marathi Serial TRP: टीआरपी स्पर्धेत ‘या’ मालिकेने मारली बाजी; जाणून घ्या टॉप 5 मालिकांची यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.