Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणासाठी पुढील 3-4 तास महत्त्वाचे; वारे वेगाने वाहणार, पावसाची दाट शक्यता

Maharashtra Politics : हवामान विभागाने पुन्हा एकदा हायअलर्ट जारी केला आहे. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात, तसेच कोकण परिसरात आजदेखील वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण परिसरात मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. तीन-चार तासांत वातावरण बदलणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • By युवराज भगत
Updated On: May 14, 2024 | 04:30 PM
Maharashtra Weather Updates: Next 3-4 hours are critical for West Maharashtra and Konkan, strong winds, chance of rain

Maharashtra Weather Updates: Next 3-4 hours are critical for West Maharashtra and Konkan, strong winds, chance of rain

Follow Us
Close
Follow Us:
मुंबई : मुंबईत (Mumbai Rain) काल वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला. यामध्ये घाटकोपर (Ghatkopar Hording Collapse) येथे मोठी दुर्घटना घडल्याचे पाहायला मिळाले. मुंबईत मोठ्या वादळी वाऱ्यासह पावासाचा गहजब पाहायला मिळाला. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये वादळी वारे आणि पाऊस बरसताना दिसत आहेत. सोमवारी संध्याकाळी मुंबई शहर, उपनगर, ठाणे, डोंबिवली, बदलापूर, नवी मुंबई या भागांना वळीवाच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले होते.
मुंबईतील वाहतूककोंडी
अवघ्या तासाभरात वादळी वारे आणि जोरदार पावसाने मुंबईतील वाहतूक व्यवस्थेची घडी विस्कटून टाकली होती. संध्याकाळच्या वेळेत पावसाने धिंगाणा घातल्याने घरी निघालेल्या चाकरमन्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर आता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने (Weather Forecast) मंगळवारी राज्यात कसे वातावरण राहील, याबाबत अंदाज जाहीर केला आहे. त्यामध्ये राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कोकण परिसरात मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा
मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने कोकण परिसरात मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. मात्र, दुपारनंतर राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. कोकणात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. येत्या तीन ते चार तासांमध्ये ठाणे, पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर आणि रायगडातील काही भागात वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. या भागात जवळपास 40 ते  50किमी प्रतितास इतक्या वेगाने वारे वाहतील. त्याचसोबतच या सर्व परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो, अशी माहिती हवामान खात्याने दिली.
हवामान खात्याकडून प्रवाशांना खबरदारीचे आवाहन
हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार मंगळवारी संध्याकाळी पुन्हा पाऊस झाल्यास रेल्वे वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. अगदी थोड्या पावसानेही मध्य रेल्वे ठप्प होते, असा लौकिक आहे. त्यामुळे आजदेखील मुंबईतील चाकरमान्यांना घरी जाताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.  कालच्या तुलनेत आज वाऱ्याचा वेग कमी राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. परंतु, वाऱ्यांचा वेग हा नेहमीपेक्षा जास्त असेल, तसेच पाऊसही असेल. त्यामुळे प्रवाशांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
वादळी वाऱ्यांमुळे पडझड
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या परिसरात सोमवारी जोरदार वारे वाहत होते. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग 100 च्या पुढे पोहोचला होता. त्यामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पडझडीच्या घटना घडल्या होत्या. घाटकोपर परिसरात वेगवान वाऱ्यांमुळे महाकाय होर्डिंग जमीनदोस्त झाले होते. या होर्डिंगच्या खाली अनेकजण दाबले गेले होते.  यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला होता.

Web Title: Next 3 4 hours are important for konkan in west maharashtra including mumbai strong winds high chance of rain nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2024 | 04:21 PM

Topics:  

  • maharashtra weather updates
  • Mumbai City
  • Mumbai Rain

संबंधित बातम्या

Mumbai Rains Live: मुंबईत पुन्हा पावसाचा Red Alert, 24 तासाच 6 मृत्यू, 5 बेपत्ता; अनेक ट्रेन्स रद्द
1

Mumbai Rains Live: मुंबईत पुन्हा पावसाचा Red Alert, 24 तासाच 6 मृत्यू, 5 बेपत्ता; अनेक ट्रेन्स रद्द

Mumbai Rain Update :  ठाणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन
2

Mumbai Rain Update : ठाणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन

Mumbai Rain Update : मिठी नदीला पूराचा धोका, NDRF दाखल, नागरिकांचंही स्थलांतर
3

Mumbai Rain Update : मिठी नदीला पूराचा धोका, NDRF दाखल, नागरिकांचंही स्थलांतर

Mumbai Rains News: मुंबईसह महाराष्ट्रात 3 जिल्ह्यात शाळा-कॉलेज बंद, पावसाने सामान्यांचे झाले हाल; तलाव भरले
4

Mumbai Rains News: मुंबईसह महाराष्ट्रात 3 जिल्ह्यात शाळा-कॉलेज बंद, पावसाने सामान्यांचे झाले हाल; तलाव भरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.