
Mumbai City FC : आय-लीगचा गोलमशीन आता मुंबई सिटीच्या ताफ्यात; लुका माजसेनशी करार
इंडियन सुपर लीगमधील (ISL) मुंबई सिटी एफसीने (Mumbai City FC) आपल्या आक्रमण फळीला अधिक बळकट करण्यासाठी स्लोव्हेनियाचा अनुभवी सेंटर फॉरवर्ड लुका माजसेन याच्याशी करार केला आहे. क्लबने 11 नोव्हेंबर रोजी याबाबत अधिकृत घोषणा केली. भारतातील विविध फुटबॉल स्पर्धांमध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या माजसेनच्या समावेशामुळे मुंबई सिटीच्या आक्रमणाची ताकद वाढणार आहे.
स्लोव्हेनियाची राजधानी ल्युब्लियाना येथे जन्मलेल्या माजसेनने 2020 मध्ये भारतीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले. त्याने चर्चिल ब्रदर्सकडून खेळताना आय-लीगमध्ये दुसरा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून हंगाम संपवला. त्यानंतर बंगळुरू युनायटेडकडून खेळताना बंगळुरू सुपर डिव्हिजनचे विजेतेपद मिळवले. या स्पर्धेत 15 गोल करत तो सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला.
जानेवारी 2022 मध्ये माजसेनने गोकुळम केरळ संघात प्रवेश केला. त्याने 13 गोल करत संघाला आय-लीगचे विजेतेपद राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच वर्षी त्याने राउंडग्लास पंजाब संघात प्रवेश केला. या संघासोबतही त्याने आय-लीगचे विजेतेपद पटकावले. या यशामुळे संघाला इंडियन सुपर लीगमध्ये बढती मिळाली.
राउंडग्लास पंजाबकडून खेळताना माजसेनने 16 गोल केले. तो आय-लीगमधील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला. त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही मिळाला. त्यानंतर इंडियन सुपर लीगमध्ये राउंडग्लास पंजाबसाठी गोल करणारा तो क्लबच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला.
यानंतर माजसेनने डायमंड हार्बर एफसीकडून खेळताना 2025-26 इंडियन फुटबॉल लीगचे विजेतेपद मिळवण्यात संघाला मदत केली.
मुंबई सिटी एफसीमध्ये प्रवेश केल्यानंतर लुका माजसेनने आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, या क्लबमध्ये सहभागी झाल्याचा मला आनंद आहे. माझ्यासाठी हे नवे आव्हान आहे. संघासाठी सर्वोत्तम योगदान देण्याचा आणि क्लबची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मदत करण्याचा माझा प्रयत्न असेल. नव्या सहकाऱ्यांना भेटण्यासाठी आणि मैदानावर उतरण्यासाठी मी उत्सुक आहे.
मुंबई सिटी एफसीचे फुटबॉल संचालक सुजय शर्मा यांनी सांगितले की, विलमार आणि अजल यांच्यासोबत आघाडीच्या फळीत अधिक पर्याय उपलब्ध व्हावेत, यासाठी माजसेनला संघात घेण्यात आले आहे. भारतीय फुटबॉल आणि आयएसएलमधील त्याचा अनुभव संघासाठी उपयुक्त ठरेल. संघाकडून निर्माण होणाऱ्या गोलच्या संधींचे रूपांतर करण्यात तो महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा आहे. त्याचे नेतृत्वगुण आणि व्यक्तिमत्त्वही संघासाठी फायदेशीर ठरेल.
IND vs NZ: भारत-न्यूझीलंड सामन्यात पुन्हा पावसाचा ‘खेळ’? चौथा वनडे रद्द होणार? पाहा Weather Report
ऑगस्ट 2014 मध्ये स्थापन झालेला मुंबई सिटी एफसी इंडियन सुपर लीगमधील प्रमुख क्लबपैकी एक आहे. 2020-21 हंगामात क्लबने आयएसएल लीग आणि कप अशी दोन्ही विजेतेपदे पटकावली होती. 2022-23 मध्ये लीग शिल्ड, तर 2023-24 मध्ये आयएसएल कप जिंकण्याची कामगिरी क्लबने केली आहे.
आशियाई स्तरावरही मुंबई सिटी एफसीने आपली छाप उमटवली आहे. 2022 आणि 2023-24 मध्ये क्लबने एएफसी चॅम्पियन्स लीगमध्ये सहभाग घेतला. या स्पर्धेत विजय मिळवणारा पहिला भारतीय क्लब होण्याचा मानही मुंबई सिटीला मिळाला आहे. अंधेरी येथील मुंबई फुटबॉल एरिना हे क्लबचे घरचे मैदान आहे.
Ans: मुंबई सिटी एफसीने स्लोव्हेनियाचा अनुभवी सेंटर फॉरवर्ड लुका माजसेन याच्याशी करार केला आहे.
Ans: लुका माजसेन हा स्लोव्हेनियाचा फुटबॉलपटू असून त्याचा जन्म ल्युब्लियाना येथे झाला आहे.
Ans: त्याने 2020 मध्ये भारतीय फुटबॉलमध्ये प्रवेश केला.