Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किनारपट्टीवर सुरक्षेबाबत हलगर्जीपणा होणार नाही; नितेश राणे यांचं वक्तव्य

जे प्रामाणिक राहीले त्या कार्यकर्त्यांचे हट्ट पुरविणार;ज्या विरोधकांनी त्रास दिला त्यांना सोडणार नाही, जाणून घ्या नेमंक काय म्हणाले नितेश राणे

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 22, 2024 | 07:09 PM
किनारपट्टीवर सुरक्षेचे आव्हान निर्माण होणार नाही, असे काम करणार, नितेश राणे यांचं वक्तव्य

किनारपट्टीवर सुरक्षेचे आव्हान निर्माण होणार नाही, असे काम करणार, नितेश राणे यांचं वक्तव्य

Follow Us
Close
Follow Us:

सिंधुदुर्ग/ भगवान लोके:   हा क्षण ज्या कार्यकर्त्यांमुळे मला अनुभवाला मिळाला. १० वर्षे आमदार म्हणुन काम करत असताना आमच्या भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वतःच्या भविष्याचा विचार न करता आमच्या खांद्याला खांदा लावुन मला साथ दिली. माझ्याबरोबर प्रामाणिक जे राहीले त्या सगळ्या माझ्या हक्काच्या कार्यकर्त्यांचे प्रत्येक हट्ट पुरविणे माझे काम आहे. जी मला मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली आहे, ही या सगळ्यामुळेच आहे. ज्या विरोधकांनी त्रास दिला त्यांना सोडणार नाही. कोकण आणि महाराष्ट्रातील किनारपट्टीवर २६/११ प्रमाणे सुरक्षेचे आव्हान निर्माण होणार नाही, असे काम करणार, असल्याचा विश्‍वास मत्स्य व बंदर विकासमंत्री ना. नितेश राणे यांनी व्यक्त केला.सिंधुदुर्ग जिल्ह्यात खारेपाटण येथे जल्लोषी स्वागतानंतर नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

कार्यकर्ते आम्हासारख्या नेत्यांना, लोकप्रतिनिधींना ताकद देतात. स्वतःच्या घराची पर्वा न करता, स्वतःच्या मुला-बाळांना वेळ न देता आम्हाला वेळ देतात, आमच्यासाठी कष्ट करतात, आमच्यासाठी घाम गाळतात, म्हणुन आज तेव्हा हक्काचे लोकप्रतिनिधी मंत्री झालेला आहे. प्रत्येकाला वाटले पाहीजे तो मंत्री झालेला आहे. कार्यकर्ते नसते तर आजचे पद नसत, त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याचा हट्ट पुरविण्याचा त्यांच्या साथीने पुढेही करणार आहे. कोकणाचे अर्थकारण आंबा, काजु, सुपारी, मासे या सगळ्या गोष्टींवर आहे. किनारपट्टीवर असलेल्या या सगळ्यांना एकत्र घेवुन सिंधुदुर्ग, कोकणचा विकास आतापर्यंत होत आलेला आहे. नारायण राणेंपासुन रविंद्र चव्हाण यांच्यापर्यंत आप्पासाहेब गोगटे या सगळ्या कोकणच्या रत्नांनी काम केले आहे. ज्यांनी या कोकणच्या विकासाला मोठ्या प्रमाणात हातभार लावलेला आहे. माझ्याकडे दोन महत्वाच्या खाती आहेत. जिल्ह्याच्या कोकणचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी फार मोठी संधी आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी विचार करुन माझ्यावर मत्स्य व बंदर विकासाची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. माझ्या पदाची जबाबदारी स्विकारुन माझ्या कोकण, महाराष्ट्राचा मत्स्य व बंदर खात्याच्या माध्यमातुन विकास करेन, असा विश्‍वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.ज्या पद्धतीने गैर, अवैध धंदे वाढताहेत कुठल्याही पद्धतीचा सुरक्षेचा आव्हान माझ्या कोकणच्या किनारपट्टीवर येता कामा नये. किंबहुना महाराष्ट्रावर येता कामा नये. २६/११ चा हल्ला हा समुद्र किनारपट्टीच्या माध्यमातुन झाला आहे. राष्ट्रीय विरोधी विचाराचे जे लोक आमच्या किनारपट्टीवर राहत आहेत. त्या सगळ्या गोष्टीवर माझा बारकाईने लक्ष असेल. सागरी सुरक्षा हा महत्वाचा भाग आहे. नुसता विकास विकास बोलत राहीलो आणि उद्या कोणी हल्ला किनारपट्टीवर केला , सीआरझेड अशी अतिक्रमण जे वाढत चाललेले आहे ते उद्या आपल्याला धोक्याचे ठरु शकतात. काही अतिरेकी संघटनेच्या मानसिकतेची लोक सुद्धा कोकण किनारपट्टीभागात वावर करत आहेत. गेल्याच महिन्यात काही अतिरेकी संघटनेच्या संबंधीत लोक रत्नागिरीत आढळून आले. ते लोक किनारपट्टी भागात राहत होते. या सगळ्या गोष्टीवर माझा बारकाईने लक्ष असेल, असेही नितेश राणे म्हणाले.

नेहमी आरोप केले जायचे, देवगडचा आमदार कधी मंत्री होऊ शकत नाही, कधी सत्ताधारी होत नाही. आता या पुढे माझ्या देवगडवर कोणीही अशा पद्धतीचा ठपका ठेवु शकत नाही तसा प्रश्‍नही कोणी विचारु नये अशा पद्धतीचे उदाहरण माझ्या निमित्ताने देवगडच्या आमदाराला मंत्री पद मिळाल्याने आहे. पालकमंत्री पद हा माझा विषय नाही. तुम्ही बोललेला विषय प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला जाईल, पण माझ्यावर पक्षाने दिलेली महायुतीचा कार्यकर्ता म्हणुन जबाबदारी पार पाडणार आहे. खा. नारायण राणे आणि रविंद्र चव्हाण यांनी काही प्रकल्प उंबरठ्यावर आणुन ठेवलेला आहे ती कामे पुर्ण करायची आहेत. खासदार नारायण राणे यांनी सुरुवातीला मत्स्य खाते सांभाळलेले आहे. बाहेर गावी जावुन काम करणाऱ्या तरुणांना पुन्हा कोकणात आणण्याचे काम केले जाणार आहे, असे नितेश राणे म्हणाले.विरोधक औषधाला शिल्लक असतील त्यांना मी उत्तर देणारच आहे. विरोधकांना नितेश राणे काय आहे? हे त्यांना चांगलेच माहीती आहे. ते सत्तेत असताना विरोधक म्हणुन माझ्याबरोबर कशे वागले? हे मला चांगले माहीती आहे. १५ डिसेंबरपासुन त्यांना ते सगळे आठवत असेल त्यांना आठवण करुन देण्याची खरी जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे.

Web Title: Nitesh ranes statement that the security challenge will not arise on the coast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2024 | 06:53 PM

Topics:  

  • Nitesh Rane
  • Ratnagiri-Sindhudurg

संबंधित बातम्या

“मत्स्यव्यवसायात महाराष्ट्र ‘नंबर वन’ करणार”; मंत्री नितेश राणेंचे प्रतिपादन
1

“मत्स्यव्यवसायात महाराष्ट्र ‘नंबर वन’ करणार”; मंत्री नितेश राणेंचे प्रतिपादन

“हा तर ‘कॉर्पोरेट जिहाद’…”; IT कंपन्यांतील महिलांच्या लैंगिक शोषणावरून नितेश राणे संतापले; म्हणाले…
2

“हा तर ‘कॉर्पोरेट जिहाद’…”; IT कंपन्यांतील महिलांच्या लैंगिक शोषणावरून नितेश राणे संतापले; म्हणाले…

“सागरी सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोनद्वारे…”; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंचे स्पष्ट निर्देश
3

“सागरी सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोनद्वारे…”; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंचे स्पष्ट निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.