रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी आवश्यक प्रक्रिया गतीने करण्यात याव्यात याबाबत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सूचना दिल्या.
मंत्री नितेश राणे यांचा नाशिक दौऱ्यात मोठा इशारा: कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकाने लागतील. त्यांनी बोगस मतदान, इंदुरीकर महाराजांवरील टीका आणि 'जिहादी हिरवे साप' यांवरून विरोधकांवर सडकून टीका केली.
महाराष्ट्राला सागरी व्यापार आणि विकासाच्या क्षेत्रात आघाडीवर नेण्यात मदत होईल. बंदर, वाहतूक, उद्योग आणि व्यवसाय या क्षेत्रातील सुविधा जागतिक दर्जाच्या बनतील, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
इंडिया मेरीटाईम वीक २०२५ च्या निमित्ताने देशासह राज्याच्या सागरी विकासात मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. सागरी गुंतवणुकीसाठी राज्यात पोषक वातावरण असून या ‘मेरीटाईम वीक’ मुळे त्यास आणखी चालना मिळेल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 192 वस्त्या आणि 25 रस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्याचा आदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सामाजिक एकतेस चालना मिळणार असून भेदभावमुक्त ओळखीची नवी दिशा मिळेल.
केंद्र सरकारने सागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची घोषणा केली असल्याचे सांगून मंत्री नितेश राणे म्हणाले की, महाराष्ट्राने देशातील पहिले जहाज बांधणी धोरण तयार केले आहे.
अधिकाऱ्यांनी स्वतः मत्स्य शेतकऱ्यांना संपर्क केल्यास त्यांचे मनोधैर्य वाढते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी स्वतः नुकसानग्रस्त मत्स्य शेतकऱ्यांची भेट घ्यावी. असे मंत्री नितेश राणे म्हणाले.
अतिवृष्टीमुळे मत्स्य शेतीच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याविषयी मंत्रालयात बैठक झाली. यावेळी मंत्री राणे यांनी सांगितले, मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची ही वेळ आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ‘ए आय’ मॉडेल याचा अभ्यास आता निती आयोग करणार आहे. हे मॉडेल देशपातळीवर राबवण्याविषयीही निती आयोग अभ्यास करणार आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीला मंत्री चंद्रकांत पाटील आणि नितेश राणे यांनी विरोध केला आहे. त्यांच्या मते, मराठा समाजाला ओबीसी श्रेणीत समाविष्ट करण्याऐवजी सध्याच्या ईडब्ल्यूएस (EWS) कोट्याचा लाभ द्या.
सिंधुदुर्ग जिल्हा हा सागर तटीय जिल्हा असून येथे मत्स्य व्यवसाय क्षेत्रात प्रशिक्षीत आणि कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी तांत्रिक दृष्टया प्रशिक्षीत आणि व्यावसायिक पदवीधरांसाठी महाविद्यालय होणे अत्यंत गरजेचे आहे.
मंत्री नितेश राणे यांनी नुकतीच या दोन एक्सप्रेस गाड्यांची घोषणा केली आहे. या उपक्रमाचे हे १३ वे वर्ष आहे. विशेष म्हणजे या दोन्ही गाड्या दादर स्थानकावरून सुटणार आहेत.
अमेरिकेने लावलेल्या अतिरिक्त कराचा विचार करता मत्स्योत्पादन स्थानिक तसेच देशांतर्गत बाजारात विक्री करणे हा एक चांगला पर्याय असल्याचे मंत्री नितेश राणे म्हणाले.
CM Fadnavis on Malegaon blast verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोजक्या शब्दांमध्ये सूचक प्रतिक्रिया दिली आहे.