मुंबई : बुधवारची सकाळ सिनेसृष्टीसाठी धक्कादायक ठरली आहे. कारण प्रसिद्ध कला दिग्दर्शन नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. (Nitin Desai Sucide) कर्जतमधील एन डी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळं सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. कला दिग्दर्शक नितीन चंद्रकात देसाई यांनी मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीला (Hindi Cinema) एका वेगळ्या वळणावर व उंचीवर घेऊन गेले होते. तसेच त्यांनी अनेक प्रसिद्ध चित्रपट केले होते. पण त्यांनी एवढ्या टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण आता समोर येवू लागले आहे. आता त्यांनी कर्जाचा बोजा, आर्थिक संकटामुळं तसेच स्टुडिओ चालत नसल्यामुळं त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोरे आलेय. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी व्हॉइस रेकॉर्ड केला होता, ती क्लिप सध्या पोलिसांकडून असून, यातून पोलीस चौकशी करताहेत. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Desai) यांनी कर्जत इथल्या एनडी स्टुडिओमध्ये (N.D. studio) गळफास घेत आत्महत्या केली. मुंबईतील जेजे रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. नितीन देसाई यांच्या पार्थिवावर शुक्रवारी म्हणजेच 4 ऑगस्ट रोजी संध्याकाळी एनडी स्टुडिओत अंत्यसंस्कार केले जातील. तर दुसरीकडे देसाई यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी केली जाणार असल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात म्हटलं आहे. (Nitin Desai’s suicide will be thoroughly investigated, ND Studio will also be taken over by the government? What did Deputy Chief Minister Devendra Fadnavis say in the Legislative Assembly)
देसाई यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करा – शेलार
दरम्यान, प्रसिद्ध कला दिग्दर्शन नितीन देसाई यांच्या आत्महत्येचं पडसाद पावसाळी अधिवेशनात देखील उमटलेत. नितीन देसाई यांच्या आत्महत्याचे सखोल चौकशी करा, गरज पडली तर विशेष पथक तयार करा, पण एका हरहुन्नरी व प्रसिद्ध मराठी माणसावर आत्महत्येची ही वेळ का आली? याची शासनाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजपा आमदार आशिष शेलारांनी केली.
स्टुडिओ शासनाने ताब्यात घ्यावा – चव्हाण
तर नितीन देसाई हे गुणी कलावंत होते, त्यांच्यावर आत्महत्येची का वेळ आली, याची सरकारने चौकशी करावी तसेच स्टुडिओ कुठल्या खासगी संस्थेच्या ताब्यात जाण्यापेक्षा देसाई यांचा स्टुडिओ चाचपणी करुन सरकरने ताब्यात घ्यावा, असं काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी सभागृहात म्हटले.
सखोल चौकशी करु, स्टुडिओची चाचपणी करु – गृहमंत्री
दरम्यान, विधानसभेत बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रसिद्ध कला दिग्दर्शन नितीन देसाई हे हरहुन्नरी कलाकार होते. त्यांच्यावर ही वेळ का आली. त्यांनी आत्महत्या का केली. याची सखोल चौकशी केली जाईल, आणि एन डी स्टुडिओ शासन ताब्यात घेण्याबाबत चाचपणी करेल, असं फडणवीस म्हणाले.