लिव्ह इन रिलेशनशिप, समलैंगिक विवाहाबाबत नितीन गडकरींचं मोठं व्यक्तव्य; नक्की काय म्हणाले?
नितीन गडकरी यांनी लिव्ह इन रिलेशनशिप, समलैंगिक विवाहाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. “लिव्ह-इन रिलेशनशिप आणि समलैंगिक विवाह समाजाच्या नियमांच्या विरुद्ध आहेत आणि यामुळे सामाजिक व्यवस्था कोसळू शकते.” असा दावा त्यांनी अनफिल्टर्ड समदीश या युट्यूब चॅनलने घेतलेल्या मुलाखतीत केला आहे. नितीन गडकरी नेहमीच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. रस्ते, सायन्सपासून अनेक मुद्द्यांवर ते मुद्देसुद बोलतात. लिव्ह इन रिलेशनशिपवरही त्यांनी आपलं स्पष्ट मंत मांडलं आहे.
“लिव्ह-इन रिलेशनशिपमुळे समाज व्यवस्था कोसळेल. समाजात काही नियम आहेत आणि त्यांचं पालन केलं करण्याची गरज आहे. मी एकदा ब्रिटीश संसदेला लंडनमध्ये भेट दिली होती आणि यूकेचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्र्यांना त्यांच्या देशासमोरील प्रमुख समस्यांबद्दल विचारले होते. त्यावेळी मला सांगण्यात आलं की, युरोपीय देशांमधील सर्वात मोठी समस्या ही आहे की पुरुष आणि महिलांना लग्न करण्यात रस नाही. ते लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय निवडत आहेत.”
त्यामुळे समलैंगिक विवाहामुळे सामाजिक व्यवस्थेचं पतन होईल”. तर “आदर्श भारतात घटस्फोटांवर बंदी आणावी का” असा प्रश्नही गडकरी यांना विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना ते म्हणाले, “नक्कीच नाही. पण लिव्ह-इन संबंध चांगले नसल्याचं ते म्हणाले.विशेष म्हणजे, २०२३ मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला होता. पण राज्यांना केंद्रीय कायदा नसल्यास समलैंगिक विवाह कायदेशीर करणारे कायदे करण्याचा अधिकार असल्याचे आपल्या निर्णयात सांगितले होते. गडकरींची ही मुलाखत सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. दरम्यान सोशल मीडियावर अनेक युजर्स यावर प्रतिक्रियाही देत आहेत.