Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Shasan : भटके-विमुक्त बांधवांच्या हक्कांसाठी विशेष अभियान! अभियानाची मुख्य माहिती, मूळ उद्देश काय ? 

Maharashtra Shasan : महाराष्ट्र शासनाच्या मागास व बहुजन कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा उद्देश भटके-विमुक्त बांधवांना आवश्यक शासकीय कागदपत्रे उपलब्ध करून देणे आणि विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 20, 2026 | 10:22 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • अभियानाची मुख्य माहिती
  • मूळ उद्देश काय ?
  • जास्तीत जास्त भटके-विमुक्त बांधवांनी या विशेष अभियानाचा लाभ घ्यावा 

 

Maharashtra Shasan :  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त भटके विमुक्त बांधवांच्या न्याय हक्का साठी राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानांतर्गत दिनांक २७ ते २९ सप्टेंबर रोजी ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ राबविण्यात येणार आहे. या विशेष अभियानांतर्गत भटके-विमुक्त बांधवांना त्यांचे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र, रहिवास व अधिवास दाखला यांसह विविध शासकीय प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांचे अधिकारी शिबिरांमध्ये उपस्थित राहणार आहेत. भटके-विमुक्त बांधवांनी या विशेष अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोशल मिडियाच्या ट्विटर अकांऊट द्वारे या संकल्पाची माहीती देण्यात आली आहे.

मागास आणि बहुजन कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळ व तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. विमुक्त जाती व भटक्या जमातींची भटकंतीची जीवनशैली लक्षात घेऊन शासनाच्या विविध योजना आणि मूलभूत हक्कांशी संबंधित कागदपत्रांचा लाभ त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे हा अभियानाचा उद्देश आहे.

 

शिबीरापूर्वी वस्तीस्तरावर लाभार्थ्यांची यादी तयार करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात येणार आहे. अभियानादरम्यान पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे तत्काळ वाटप करण्यावर भर दिला जाणार आहे. संबंधित उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच जिल्हा व तालुकास्तरावरील विविध विभागांचे सक्षम अधिकारी शिबिरांना उपस्थित राहणार आहेत.

 

भटके-विमुक्त बांधवांच्या हक्कांसाठी विशेष अभियान! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिनानिमित्त ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत 27, 28 आणि 29 सप्टेंबर 2026 रोजी राज्यभर ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ राबविण्यात येणार आहे. या विशेष अभियानांतर्गत… pic.twitter.com/tPOEHupGx7 — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 20, 2026

अभियानाचे उद्घाटन संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असून स्थानिक खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधींनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. जिल्हाधिकारी अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समन्वय साधतील. शिबिरांचे ठिकाण आणि वेळ याबाबतची माहिती संबंधित जिल्हा व तालुका प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

अभियानाची मुख्य माहिती 

महाराषट्रातील भटक्या विमुक्ता पर्यंत ही योजना पोहचता यावी आणि महाराष्ट्रराज्यात त्याच्या जमातीची संख्या लक्षणीय आहे तर त्याच्या जिवन शैलीमुळे भटक्या विमुक्ताच्या योजना त्याच्या पर्यंत पोहचवणे आवश्यक असल्याचे या शासन निर्णयात दिले आहे.

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका

मूळ उद्देश काय ?

भटक्या -विमुक्तांना न्याय आणि  हक्क मिळून देऊन त्यांना शासकीय कागदपत्रे उपलब्ध करून देणे हा उद्देश शासनाचा आहे. यात भटक्या विमुक्तांसाठी आधाक कार्ड , मतदान ओळखपत्र , जात प्रमाण पत्र , उत्पनाचा दाखला नाॅन क्रीमीलेयर , रहिवासी दाखला अशी कागद पत्रे उपलब्द करुन देणे होय .

Dombivli News : मोदींच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत ‘आशीर्वादाचा दिवा’, रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ‘सेवा संकल्प अभियान’ सुरु

    जास्तीत जास्त भटके-विमुक्त बांधवांनी या विशेष अभियानाचा लाभ घ्यावा 

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त भटके विमुक्त बांधवांच्या न्याय हक्का साठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक २७ ते २९ सप्टेंबर रोजी होणार असून या कार्यक्रमाला संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहे.  भटके विमुक्तांसाठी मिळणाऱ्या योजनांचा लाभ कसा घेता येईल ते या शिबिरा मार्फत कळणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त भटके-विमुक्त बांधवांनी या विशेष अभियानाचा लाभ घ्यावा 

     

    Web Title: Nt dnt rights certificate campaign maharashtra september 27 29

    Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

    Published On: Sep 20, 2026 | 10:22 PM

    Topics:  

    • Breking News in Maharashtra
    • cm of maharashtra

    Popular Sections

    • देश
    • विदेश
    • लाईफस्टाईल
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • व्यापार
    • वेब स्टोरीज

    Maharashtra Cities

    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • ठाणे
    • नाशिक
    • रत्नागिरी
    • पालघर
    • रायगड

    More

    • धर्म
    • ऑटो
    • करिअर
    • व्हायरल
    • फोटो
    • नवराष्ट्र विशेष
    • टेक
    • व्हिडिओ

    Follow Us On

    Contact Us About Us Privacy Policy
    Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

    © Copyright Navarashtra 2026 All rights reserved.