Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : ठाणे मनपाच्या शिक्षण विभागाची यादी जाहीर; अनधिकृत शाळांची धक्कादायक आकडेवारी उघड

१ जुलैपासून ठाणे मनपा हद्दीतील दिव्यातील सर्व अधिकृत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय दिव्यातील इंडिपेडेंट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशन या अधिकृत शाळाचालकांच्या संघटनेच्या प्रतिनिधींनी केला आहे. नेमकं प्रकरण काय जाणून घ्या, सविस्तर

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 30, 2025 | 12:47 PM
Thane News : ठाणे मनपाच्या शिक्षण विभागाची यादी जाहीर; अनधिकृत शाळांची धक्कादायक आकडेवारी उघड
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे :  मनपाच्या शिक्षण विभागाने नुकतीच अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. या यादीतील अनधिकृत शाळांची आकडेवारी ही धक्कादायक असल्याचं समोर येत आहे. ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने यंदाच्या वर्षात जाहीर केलेल्या ८१ अनधिकृत शाळांपैकी ६१ शाळा या एकट्या दिवा परिसरातील असून या शाळा बंद करण्यासाठी कोणतीच कारवाई होत नसल्याचा आरोप करत या शाळा बंद करण्याच्या मागणीसाठी १ जुलैपासून दिव्यातील सर्व अधिकृत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय दिव्यातील इंडिपेडेंट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशन या अधिकृत शाळाचालकांच्या संघटनेच्या प्रतिनिधींनी केला आहे. असे असले तरी दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

सरकारी नोकरी: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2964 पदांवर भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख आज

दिव्यातील इंडिपेडेंट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. ठाणे महापालिकेक़डून दरवर्षी अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात येते. मात्र, त्या शाळा बंद करण्याबाबत कोणतीच कारवाई करण्यात येत नाही. यामुळेच या शाळांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असल्याची आकडेवारीच संघटनेने मांडली.

ठाणे महापालिकेने २०२३ मध्ये ४७ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली होती. त्यात ३० शाळा दिव्यातील होत्या. २०२४ मध्ये पालिकेने जाहीर केलेल्या यादीत ७५ शाळा अनधिकृत होत्या आणि त्यात दिव्यातील ६१ शाळांचा समावेश होता. यंदाच्या वर्षी म्हणजेच पालिकेने २०२५ मध्ये ८१ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली असून त्यात दिव्यातील ६१ शाळांचा समावेश आहे. त्यात यंदाच्या जून महिन्यात दिव्यात आणखी ८ अनधिकृत शाळा सुरू झाल्या आहेत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष साईनाथ म्हात्रे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या बेकायदा शाळा बंद करण्याची मागणी गेली चार वर्षांपासून शिक्षण विभागाकडे करत आहोत. यासाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतीच कारवाई केली जात नाही. या बेकायदा शाळेत पात्र नसलेले शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

बेकायदा शाळांमुळे पालकांची तसेच समाजाची दिशाभुल होत असल्याचा आरोप त्यांनी केला. या बेकायदा शाळा बंद करण्याच्या मागणीसाठी दिव्यातील सर्व अधिकृत शाळा १ जुलै पासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. यात, लहान शिशू ते इयत्ता नववी चे वर्ग बंद राहणार आहेत. तर, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु राहतील, अशी माहितीही त्यांनी दिली.

रॅगिंगवर UGC ची मोठी कारवाई! IIT, IIM आणि AIIMS ला देखील बजावली कारणे दाखवा नोटीस

Web Title: Of the 81 unauthorized schools declared by the thane municipal corporations education department this year 61 are in this diva area alone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 12:47 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.