Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बदललेले जुने मीटर चक्क कॅनॉलवर फेकले; स्मार्ट मीटर योजनेतील धक्कादायक प्रकार उघड

विशेषतः हे बदलण्यात आलेले जुने मीटर हे संबंधित खाजगी कंपनीने महावितरण विभागाच्या कार्यालयात जमा करणे अनिवार्य आहे. मात्र, असे न करता बदललेले अंदाजे शंभरहून अधिक मीटर हे या रस्त्यावरील असणाऱ्या कॅनॉलच्या कडेला फेकून दिले असल्याची धक्कादायक बाब समोर आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 08, 2026 | 12:55 PM
स्मार्ट मीटर योजनेतील धक्कादायक प्रकार उघड; बदलेले जुने मीटर चक्क कॅनॉलवर फेकले

स्मार्ट मीटर योजनेतील धक्कादायक प्रकार उघड; बदलेले जुने मीटर चक्क कॅनॉलवर फेकले

Follow Us
Follow Us:
  • वडूजमध्ये स्मार्ट मीटर योजनेतील धक्कादायक प्रकार
  • जुने वीज मीटर कॅनॉलजवळील माळरानावर फेकल्याचा आरोप
  • दहिवडी रस्त्यावरील वस्तीतील ग्राहकांचे मीटर बदलले
वडूज : खटाव तालुक्यातील वडूज शहरातील एका नागरी वस्तीवरील वीज ग्राहकांचे वीज मीटर चक्क कॅनॉलच्या ठिकाणी माळरानावर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेषतः संबंधित कंपनीच्या एका जबाबदार व्यक्तीला याची माहिती दिल्यानंतर सुद्धा यावर कोणीही लक्ष न दिल्याने अनेक सामजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे स्मार्ट मीटर बसवा आणि जुना मीटर कॅनॉल वर मिळवा अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यासाठी महावितरण कंपनी कडून सांगण्यात येत आहे. अनेक वीज ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसविले आहेत. यासाठी एका खाजगी कंपनीला हे स्मार्ट मीटर बसविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर या कंपनीच्या कामगारांकडून अनेक ठिकाणी हे स्मार्ट मीटर बसविले जात आहेत. यासाठी काही संघटनांनी विरोध केला असला तरी ही हे स्मार्ट मीटर बसविणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात येत आहे. तर वडूज शहरातील दहिवडी रस्त्यावरील एका वस्तीवरील काही वीज ग्राहकांचे मीटर काढून त्याठिकाणी स्मार्ट मीटर जोडण्यात आले आहेत.

विशेषतः हे बदलण्यात आलेले जुने मीटर हे संबंधित खाजगी कंपनीने महावितरण विभागाच्या कार्यालयात जमा करणे अनिवार्य आहे. मात्र, असे न करता बदललेले अंदाजे शंभरहून अधिक मीटर हे या रस्त्यावरील असणाऱ्या कॅनॉलच्या कडेला फेकून दिले असल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यानंतर काही प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी ही बाब महावितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकारी मस्के यांच्याशी संपर्क साधून निदर्शनास आणली. मात्र, त्यांनी हा विषय वडूज कार्यालयाच्या अंतर्गत येत असल्याने आपण संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा, अशी टोलवाटोलवी करण्यात आली. यानंतर संबंधित विभागाचे अधिकारी दिवटे यांना या प्रकाराबाबत सांगण्यात आल्यानंतर वडूज कार्यालयातील अधिकाऱ्यांनी मात्र या गंभीर विषयाकडे कानाडोळा करत एका वायरमनला याठिकाणी पाठवून पाहणी करण्यास सांगितली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सामजिक कार्यकर्ते दिगंबर शिंगाडे यांनी याठिकाणी येऊन महावितरण विभागाचे दीडवाघ यांना याबाबतची माहिती दिली आणि घटनेचे गांभीर्य सांगितले. दीडवाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित खाजगी कंपनीच्या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला. मात्र ‘गुर्मीत’ असणाऱ्या या अधिकाऱ्याने आपण जणू. ‘अडानी’ असल्याचे दाखवत आपल्याला यातील काही माहितीच नसल्याचे दाखवून दिले.

सदरचा प्रकार का महावितरणच्या उच्च वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जाऊन सुद्धा या खाजगी कंपनीच्या ‘अडानी’पणाची भूमिका घेणाऱ्या कर्मचाऱ्याला कोणताही फरक पडला नाही. त्यामुळे या खाजगी कंपनीच्या जबाबदार कर्मचाऱ्याचा आणि महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांचे काही साटेलोटे आहे की काय असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. याठिकाणी टाकलेले मीटर महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी गोळा करून नेले खरे मात्र आता या गंभीर प्रकाराबाबत वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

‘अडानी’ भूमिका घेणाऱ्या शुभम गुरव याच्यावर कारवाई व्हावी

सदर घडलेल्या या प्रकाराबाबत संबंधित खाजगी कंपनीचा खटाव तालुक्याची जबाबदारी घेणारा शुभम गुरव याला संपर्क साधण्यात आला. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ही घटना गंभीर असून याबाबत सविस्तर माहिती सुद्धा दिली. मात्र, या गुरव महाशयाने स्वतःची जबाबदारी झटकून एका सामान्य कर्मचाऱ्याच्या अंगावर ही घटना ढकलून जणू माझा काय संबंधच नाही असे दाखवून दिले. त्यामुळे तालुक्याची जबाबदारी असणाऱ्या या ‘अडानी’ भूमिका घेणाऱ्या शुभम गुरववर कारवाई करावी अशी मागणी काही संघटनेने केली आहे. अन्यथा लवकरच महावितरण विभागाच्या वरिष्ठ कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे.

FAQ

1. स्मार्ट मीटर योजनेत वडूजमध्ये काय प्रकार समोर आला?
वडूज शहरातील दहिवडी रस्त्यावरील एका वस्तीतील वीज ग्राहकांचे जुने मीटर काढल्यानंतर ते कॅनॉलजवळील माळरानावर फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

2. स्मार्ट मीटर बसविण्याची जबाबदारी कोणाकडे आहे?
महावितरणने स्मार्ट मीटर बसविण्याचे काम एका खासगी कंपनीला दिले असून, त्या कंपनीचे कर्मचारी विविध ठिकाणी स्मार्ट मीटर बसवत आहेत.

3. जुने वीज मीटर कुठे आढळले?
काढण्यात आलेले जुने वीज मीटर कॅनॉलच्या ठिकाणी माळरानावर फेकलेल्या अवस्थेत आढळले.

Web Title: Old meters that were replaced were found dumped in canal incident in vaduj nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 12:55 PM

Topics:  

  • mahavitaran
  • smart meter

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.