bjp Minister Pankaja Munde's reaction on Satish Bhosale's arrest
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आठवा स्मृतिदिन आज 3 जून रोजी आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम गोपीनाथ गडावर होणार आहे. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील मुंडे समर्थक गोपीनाथ गडावर येणार आहेत. कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात स्मृतिदिनाला समर्थकांना गोपीनाथ गडावर यायला मिळालं नव्हतं. आता दोन वर्षांनंतर गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुंडे समर्थक गोपीनाथ गडावर येणार आहेत. या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे सुद्धा गोपीनाथ गडावर येणार आहेत.