फोटो सौजन्य -iStock
राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे नाले तुडूंब भरून वाहत आहेत, ज्यामुळे अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे. या घाणीतून डासांची उत्पत्ती होत आहे. ज्यामुळे नागरिकांना डेंग्यू सारख्या गंभीर आजाराचा सामना करावा लागत असून अनेकांचा जीव जात आहे. अशीच एक धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यात देखील घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर ग्रामपंचायत परिसरात एका व्यक्तिचा डेंग्युमुळे मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. याप्रकरणी मृताच्या नातेवाईकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
हेदेखील वाचा- Apple ने लाँच केलं tvOS 18 बीटा अपडेट! जाणून घ्या फीचर्स
सतत सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर गावातील नाले तुडूंब भरून वाहत आहेत. यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झालं आहे, ज्यामुळे डासांची उत्पत्ती होत आहे. यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात येत आहे. एवढंच नाही तर गावातील एका व्यक्तिचा डेंग्यूच्या आजारने मृत्यू झाल्याचं देखील समोर आलं आहे. गजानन करडेल (वय ४८) असं या व्यक्तिचा नाव आहे. गजानन करडेल यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी आधी बुलढाणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी गजानन करडेल यांच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी प्रचंड संताप व्यक्त केला. ग्रामपंचायतीच्या भोंगळ काराभारामुळे गजानन करडेल यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवईकांनी केला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध संतप्त नातेवाईकांनी मृतदेह संभाजीनगर येथून थेट ग्रामपंचायत समोर आणून ठेवला. या घटनेने खळबळ उडाली होती. ग्रामपंचायतने तात्काळ गावात स्वच्छता अभियान राबवावं आणि नागरिकांचे धोक्यात आलेले आरोग्य वाचवावे, अशी मागणी संतप्त नातेवाईतकांनी केली. यानंतर ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी नातेवाईकांची समजूत काढली. गावात स्वच्छता अभियान राबवण्याचे आश्वासन ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना दिले. यानंतर मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले.
डेंग्यूची लक्षणे
हेदेखील वाचा- जेवण बनवताना कोणत्या तेलाचा वापर करावा? डॉक्टर श्रीराम नेनेंनी दिला गृहिणींना खास सल्ला
उपाय
घरांच्या अवती-भवती अथवा टेरेस वर पडलेल्या रिकाम्या कुंड्या, प्लॅस्टिकच्या वस्तू, टायर यासारख्या वस्तूंमध्ये पावसाचं पाणी साचून त्यात डासांची उत्पत्ती स्थाने निर्माण होतात. अशी ठिकाणे नष्ट करावीत. खिडक्यांना जाळ्या बसवून (स्क्रीनिंग करून) घरात किंवा कार्यस्थळी डासांच्या शिरकावा होण्यास प्रतिबंध करावा. आपल्याला डास चावणार नाहीत यासाठी सर्वतोपरी बंदोबस्त करावा. आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.