Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Weather: ‘या’ जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी; उन्हाच्या कडाक्याने महाराष्ट्र होरपळला, तर पाणीसाठा…

जळगाव, गोंदिया, मुंबईत देखील तापमानाचा पारा वाढल्याचे चित्र आहे. उष्णतेपासून वाचण्यासाठी शासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे. राज्यातील धरणातील पाणीसाठा कमी होत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 26, 2025 | 02:17 PM
Maharashtra Weather: ‘या’ जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी; उन्हाच्या कडाक्याने महाराष्ट्र होरपळला, तर पाणीसाठा…
Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर: गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात उन्हाचा पारा वाढला आहे. एप्रिल आणि मे महिन्यातील ऊन आता मार्च महिन्यातच जाणवू लागले आहे. दरम्यान उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरमधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेल्याचे समोर आले आहे. सोयगाव तालुक्यात ही घटना घडली आहे.

कडक उन्हाचा फटका राज्यभर जाणवत आहेत. राज्य सरकारने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे राज्यातील पाणीसाठयावर देखीलयांचा परिणाम होताना दिसून येत आहे. राज्यातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तापमान 35 ते 40 अंश दरम्यान पोहोचले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

जळगाव, गोंदिया, मुंबईत देखील तापमानाचा पारा वाढल्याचे चित्र आहे. उष्णतेपासून वाचण्यासाठी शासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे. राज्यातील धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. दरम्यान महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोयना धरणाची ओळख आहे. कोयना धरणाच्या पाणीसाठयात देखील झपाट्याने घट होताना दिसत आहे.

महाराष्ट्राची ‘भाग्यलक्ष्मी’ म्हणून ओळख असलेल्या कोयनेच्या पाणीसाठ्यात घट

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असलेल्या कोयना नदीच्या शिवसागर जलाशयाची पाणीपातळी तीव्र उन्हाळ्याने घटू लागली असून नदीचे पात्र मोठ्या प्रमाणात उघडे पडू लागले आहे, त्यामुळे जलाशयातील बेटे दिसू लागली आहेत. १०५ टीएमसी क्षमता असलेल्या कोयनेची पाणी पातळी यावर्षी शंभर टक्के भरली होती. सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे वीज निर्मिती, शेतीसाठी व पिण्याचे पाणी, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात होणारे बाष्पीभवन यामुळे पाणी दिवसेंदिवस वेगाने कमी होत आहे. त्यामुळे आगामी काळात प्रशासनाला पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

पाणी पातळी घटल्याने बामणोली, तापोळा भागातील मुख्य दळणवळणाचे साधन असलेल्या बोटी चालवणे अवघड बनत आहे. पात्र उघडे पडू लागल्याने उन्हातान्हात पात्रातून लोकांना पायपीट करावी लागत आहे. विशेषतः सोळशी व कोयना नदीच्या खोऱ्यातील तापोळ्याच्या वरील भागातील पाणी वेगाने कमी होवून या भागातील लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर या भागातील प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठीही नदीपात्रातील पायी चालण्याचे अंतर वाढत आहे. त्यामुळे पर्यटक संख्या ही कमी होवू लागली आहे.

Koyna Dam: महाराष्ट्राची ‘भाग्यलक्ष्मी’ म्हणून ओळख असलेल्या कोयनेच्या पाणीसाठ्यात घट; वीजनिर्मितीवर परिणाम होणार?

पुण्यात ‘पाणीबाणी’! टँकरच्या 4 लाख फेऱ्या

एकीकडे समान पाणी पुरवठा (चाेवीस तास) याेजनेचे काम सुरु असले तरी टॅंकरद्वारे पाणी पुरवठा त्याच प्रमाणात वाढत आहे. यावर्षी टॅंकरच्या सुमारे चार लाख ४ हजार इतक्या फेऱ्या झाल्या अाहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यात चार हजारांनी वाढ झाली आहे. सध्या वाढत्या तापमानामुळे शहरात पाण्याची मागणीत वाढ हाेत आहे.  गेल्या दोन महिन्यांत टॅंकरच्या फेऱ्या वाढत आहे.  जानेवारी महिन्यात ३९ हजार ६९२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. त्याचवेळी फेब्रुवारी महिन्यात ३८ हजार ५२२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.

Web Title: One man loss their life because heat stroke chatrapati sambhajinagar maharashtra weather news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2025 | 02:17 PM

Topics:  

  • chhatrpati sambhaji nagar
  • heat wave
  • Heat Wave in Maharashtra

संबंधित बातम्या

नवतपाची होणार “या” दिवसापासून सुरवात; हे टिप्स करा फॉलो
1

नवतपाची होणार “या” दिवसापासून सुरवात; हे टिप्स करा फॉलो

लग्नासाठी तगादा लावल्याने प्रेयसीचा गळा दाबून खून; आरोपीला जन्मठेप
2

लग्नासाठी तगादा लावल्याने प्रेयसीचा गळा दाबून खून; आरोपीला जन्मठेप

महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा इशारा; राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिले ‘हे’ निर्देश
3

महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा इशारा; राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिले ‘हे’ निर्देश

Maharashtra Weather: गेल्या दहा वर्षातील यंदाचा एप्रिल सर्वाधिक ‘हॉट’; ४० अंशाच्या वर पोहोचले तापमान
4

Maharashtra Weather: गेल्या दहा वर्षातील यंदाचा एप्रिल सर्वाधिक ‘हॉट’; ४० अंशाच्या वर पोहोचले तापमान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.