Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde Threat : एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या; सोशल मीडियावर दिली होती जिवेमारण्याची धमकी

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका तरुणाने समाजमाध्यांद्वारे शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली होती. धमकी देणारा तरुण शिंदे यांच्याच कोपरी-पाचपाखाडी मतदार संघातील असल्याचे समोर आलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 06, 2025 | 06:23 PM
एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या; सोशल मीडियावर दिली होती जिवेमारण्याची धमकी

एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या; सोशल मीडियावर दिली होती जिवेमारण्याची धमकी

Follow Us
Close
Follow Us:

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका तरुणाने समाजमाध्यांद्वारे शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली होती. धमकी देणारा तरुण शिंदे यांच्याच कोपरी-पाचपाखाडी मतदार संघातील असल्याचे समोर आलं असून या तरुणाला ठाणे पोलिसांनी आज बेड्या ठोकल्या आहेत. धमकी देण्यामागच कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. पोलिसांकडून त्याचा कसून तपास सुरू आहे. हितेश प्रकाश धेंडे (२६) असं या तरुणाचं नावं आहे.

#WATCH | Maharashtra: Prashant Kadam, DCP Thane says, ” The accused is 27 years old, he lives in Srinagar, he is a 9th fail. We have arrested him…the accused used his friend’s mobile and posted a threat video against Dy CM Eknath Shinde on Instagram. FIR was registered in… pic.twitter.com/RtdTICB7MN

— ANI (@ANI) January 6, 2025

शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा सामना रंगला आहे. दोन्ही पक्षांच्या समर्थकांकडून एकमेकांवरोधात समाजमाध्यमांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. असे प्रकार सुरू असतानाच रविवारी एका तरुणाने एक चित्रफित प्रसारित केली. यामध्ये त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ करत जिवेमारण्याची धमकी दिली. ही चित्रफित प्रसारित होताच, ठाण्यात शिवसेैनिकांकडून संपात व्यक्त होत होता. वागळे इस्टेट भागातील शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी परेश चाळके यांच्या शिवसैनिकांनी रविवारी रात्री श्रीनगर पोलिस ठाणे गाठले आणि शिंदे यांना धमकी देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

#WATCH | Thane, Maharashtra: The man who gave threat to Maharashtra Dy CM Eknath Shinde, on social media, was arrested by Police. pic.twitter.com/Z6348qdUyn

— ANI (@ANI) January 6, 2025

हितेश हा वागळे इस्टेट येथील वारळीपाडा परिसरात राहतो. हा परिसर शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदार संघात येतो. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी हितेशचा शोध सुरू केला होता. दरम्यान, सोमवारी सकाळी पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केली. त्याने असे कृत्य का केले, हे अद्याप समजू शकलेले नसून पोलिस त्याचा तपास करित आहेत. या संदर्भात वागळे परिमंडळाचे पोलिस उपायुक्त प्रशांत कदम यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी धमकी देणाऱ्या तरुणास अटक केल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. तसेच त्याने असे कृत्य का केले, हे अद्याप समजू शकलेले नसून त्याचा तपास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: One person arrested thane police who threat deputy cm eknath shinde on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 05:40 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.