राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात; नाफेड 'एनसीसीएफ'कडून खरेदी होत नसल्याने चिंतेत भर
नाशिक : अवकाळी पावसामुळे कांद्याचे प्रचंड नुकसान झाले. त्यातच आता बाजारातही कांद्याला भाव मिळत नाही. गुरुवारी सर्वाधिक 20 रुपये किलो घाऊक भाव मिळाला. तर दुसरीकडे, केंद्र सरकारच्या नाफेड एनसीसीएफमार्फतही कांद्याची खरेदी होत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
नाफेड एनसीसीएफमार्फत सुमारे 3 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, तीन महिने उलटले तरीही खरेदी सुरू झालेली नाही. लासलगावात सध्या कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. घोषणा होऊन अद्याप नाफेडची कांदा खरेदी नाही. नाफेडला जर कांदा खरेदी करायचा असेल तर तीन हजार रुपये क्विंटलने कांदा खरेदीची मागणी करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना लाभ होईल.
सध्या कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. तीन महिन्यांपूर्वी नाफेड, एनसीसीमार्फत कांदा खरेदी केला जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, खरेदी सुरू झाली नाही.
हेदेखील वाचा : School abuse case : शालेय विद्यार्थिनींच्या प्रकरणाचे विधानसभेत पडसाद उमटले, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले महत्त्वाचे आदेश
दरम्यान, नाफेडच्या अध्यक्षांनी पण या व्यवस्थेवर बोट ठेवले होते. मग तरीही त्याच पद्धतीची खरेदी यावर्षी सुरू आहेत का? अशा शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. त्यामुळे कांदा खरेदीत पारदर्शकता आणणे गरजेचे आहे, असे शेतकऱ्यांचे मत आहे.
लासलगाव बाजारात झाली सर्वाधिक आवक
गुरुवारी छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत ३६३२ क्विंटल कांद्याची आवक झाली, तर कमीत कमी ३०० रुपये क्विंटलने भाव मिळाला, जो ३५० रुपयांनी कमी होता. तर सरासरी दर १७५ रुपयांनी उतरले. तसेच लासलगावमध्ये सर्वाधिक ९ हजार २८२ क्विंटल कांद्याची आवक झाली. आवक जास्त असली तरीही भाव मात्र आधीपेक्षा २५ रुपयांनी कमी मिळाला. कोल्हापुरात जास्तीत जास्त २ हजार रुपये भाव मिळाला, जो मागील दरापेक्षा २०० रुपयांनी कमी होता.