Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामती बस स्थानकाच्या जागेवर मूळ मालकांचा दावा; वंचित बहुजन युवा आघाडीचे बेमुदत चक्री धरणे आंदोलन

  • By युवराज भगत
Updated On: Jan 18, 2024 | 06:09 PM
बारामती बस स्थानकाच्या जागेवर मूळ मालकांचा दावा; वंचित बहुजन युवा आघाडीचे बेमुदत चक्री धरणे आंदोलन
Follow Us
Close
Follow Us:
बारामती : शहरातील बारामती बस स्थानकाचे काम जवळपास पूर्णत्वास आले असताना बस स्थानकाच्या जागेवर आमचा मालकी हक्क अद्याप कायम असल्याचा दावा करत या जागेचे हस्तांतरण झाले नसल्याचे स्पष्ट करत मूळ जागा मालकांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या बस स्थानकाच्या समोर गेली ११ दिवसांपासून बेमुदत चक्री उपोषण सुरू केले आहे.
वंचितच्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात उपोषण
वंचित बहुजन आघाडी पुर्व विभाग युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना निकाळजे म्हणाले, बारामती- बारामती मधील गट नं.गट क्र.६/३/अ, ब, ६/४/अ, ६/४/अ/१,२ मधील जागेमध्ये एस टी महामंडळने मूळ मालकांना विचारात न घेता व जागेचा कोणताही मोबदला न देता बेकायदेशीर ताबा घेऊन त्यावर एसटी बसस्थानकाचे काम चालू आहे. या जागेचा सात-बारा  उतारे हे आज ही मूळ जमीन मालकांच्या नावावर आहेत.
बारामती शहरात निषेध मोर्चा
या जागेचे कोणत्याही प्रकारचे संपादन अथवा हस्तांतरण झाले नाही. त्यामुळे ही जागा आज ही मूळ मालकांच्या नावावरील महार वतनाची जागा आहे. या संदर्भात १५ ऑगस्ट २०२३ रोजी उपोषण केले होते, तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बारामती शहरात निषेध मोर्चा देखील काढण्यात आला होता ;परंतु प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दिशाभूलीची उत्तरे देण्यात आली असल्याने निकाळजे  यांच्या नेतृत्वामध्ये दि ८ जानेवारी पासून बारामती बस्थानाकासमोर बेमुदत चक्री धरणे आंदोलन चालू आहे .या आंदोलनामधील मागण्या मध्ये  गट नं.गट क्र.६/३/अ, ब, ६/४/अ, ६/४/अ/१,२ मधील मूळ मालकांना जागेचा पाच पट मोबदला देण्यात यावा.
बारामती बस स्थानकाला नाव देण्याची मागणी
गट क्र.६/३/अ, ब, ६/४/अ, ६/४/अ/१,२ मधील मालकी हक्काच्या जागेवर बेकायदेशीर ताबा घेऊन मालकांची फसवणूक करणाऱ्या  अधिकाऱ्यावर ऍट्रॉसिटी कायाद्या नुसार करवाई करण्यात यावी.
बारामती बस्थानकाची जागा ही महार वतनी असल्याने या बसस्थानकाला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव बारामती स्थानकाला देण्यात यावे तसेच इतर मागण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे.
जो पर्यंत हा विषय मार्गी लागणार नाही तो पर्यंत बारामती बस स्थानाकाचे उद्घाटन करू देणार नाही व हे बेमुदत चक्री आंदोलन चालू राहणार असल्याची माहिती  मंगलदास निकाळजे यांनी दिली .यावेळी जिल्हा उपाध्यक्ष गणेश थोरात,उपाध्यक्ष किरण मिसाळ,  सचिव  मंगेश लोंढे, सहसचिव कृष्णा साळुंके, शहर सचिव विनय दामोदरे, मोहन शिंदे, सागर गवळी, आनंद जाधव जितेंद्र कवडे, मयूर सोनवणे, शिवाजी सोनवणे, कांता सोनवणे, कविता सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Original owners claim to baramati bus station site vanchit bahujan yuva aghadis indefinite cycle dharne movement nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2024 | 06:09 PM

Topics:  

  • babasaheb ambedkar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.