Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

…अन्यथा उरमोड, कण्हेर धरणाचे पाणी अडवणार; शिवेंद्रसिंहराजेंचा इशारा

जावली तालुका हा डोंगराळ व दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. येथील पर्जन्यमान अधिक असले तरी पावसाळयात वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे ऐन उन्हाळयात फेबुवारी, मार्च, एप्रिल, मे या चार महिन्यात जनतेला तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागते.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 28, 2022 | 02:48 PM
…अन्यथा उरमोड, कण्हेर धरणाचे पाणी अडवणार; शिवेंद्रसिंहराजेंचा इशारा
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : जावली तालुक्यातील केळघर व मेढा विभागातील पाणी टंचाई दूर व्हावी, यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प उभारण्यात यावा, अशी येथील जनतेची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. बोंडारवाडी धरणाला मंजुरी देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करून धरणाबाबत येत्या दहा दिवसात सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा उरमोडी आणि कण्हेर धरणाचे पाणी अडवून धरू, पाणी सोडू देणार नाही असा गंभीर इशारा शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

यासंदर्भात शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्यासह जलसंपदा, पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, मोहनराव कासुर्डे, रामभाऊ शेलार, हरिभाऊ शेलार, बबनराव बेलोशे, राघव बिरामणे, नाना जांभळे, सागर धनवडे, बाजीराव सुर्वे, सुभाष शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

जावली तालुका हा डोंगराळ व दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. येथील पर्जन्यमान अधिक असले तरी पावसाळयात वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे ऐन उन्हाळयात फेबुवारी, मार्च, एप्रिल, मे या चार महिन्यात जनतेला तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. ग्रॅव्हीटीने मिळणारे पाणी पूर्णत: आटते तसेच पाण्याचा अन्य कोणताही स्त्रोत उपलब्ध होत नाही. त्यामुळे बोंडारवाडी धरण होणे अत्यावश्यक आहे.

राज्य शासनाने पिण्याचे पाणी आणि औद्योगिक वापरासाठी शिल्लक असलेले पाणी देण्याबाबत औंध व अन्य ठिकाणी दिलेल्या मंजूरीच्या धर्तीवर बोंडारवाडी प्रकल्पास मंजूरी देण्यात यावी, अशी आमचा मागणी असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समवेत उच्चस्तरीय बैठक आयोजीत करण्यात यावी. बोंडारवाडी प्रकल्पाबाबत येत्या १० दिवसात शासनाने सकारात्कम निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी केली.

Web Title: Otherwise water of urmod kanher dam will be blocked warning of shivendra singh raje nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2022 | 02:48 PM

Topics:  

  • Shivendra Raje Bhosale

संबंधित बातम्या

Marathi Sahitya Sammelan : अवघी सातारानगरी साहित्यमय! ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची भव्य ग्रंथदिंडी
1

Marathi Sahitya Sammelan : अवघी सातारानगरी साहित्यमय! ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची भव्य ग्रंथदिंडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.