एलपीजीच्या किंमती, क्रेडिट कार्डचे नियम...; 1 नोव्हेंबरपासून 'हे' 6 मोठे बदल होणार?
चंद्रपूर : शहरातील सर्व एलपीजी कंपन्यांच्या वितरकांनी आता ग्राहकांना ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर मोबाईलवर मिळालेला ओटीपी देणे बंधनकारक केले आहे. म्हणून, जेव्हा कोणी तुमच्या घरी सिलिंडर डिलिव्हरीसाठी येतो तेव्हा तुम्हाला तो ओटीपी त्या व्यक्तीला सांगावा लागेल. त्यामुळे घराबाहेर राहणाऱ्या लोकांना हा ओटीपी क्रमांक त्यांच्या कुटुंबीयांना सांगावा लागेल, अन्यथा सिलिंडर मिळण्यास अडचण येऊ शकते.
गॅस सिलिंडरचे बुकिंग आता मोबाईलवरूनच करावे लागणार आहे. मात्र, आता या पद्धतीला संरक्षण देण्यासाठी नवा नियम लागू करण्यात आला आहे. यामध्ये सिलिंडर वितरणासाठी ओटीपी आवश्यक असेल. डिलिव्हरीसाठी आलेली व्यक्ती तुमच्या सिस्टममध्ये दिलेला ओटीपी चेक करेल. दोन्ही समान असल्यास सिलिंडर वितरित केले जाईल. तुम्ही ज्या नंबरवरून सिलिंडर बुक केला आहे तो नंबर जर घरी नसेल तर तुमच्या कुटुंबाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
गॅस बुकिंगची खात्री करण्यासाठी घरातील इतर लोकांना संदेश पाठवावा लागेल. तरीही या नियमामुळे ग्राहक नाराज असून अनेकदा सिलिंडरवरून वितरकांशी भांडण झाल्याचे चित्र आहे.
…अन्यथा सिलिंडर नाहीच
आता सिलिंडर वितरणासाठी ओटीपी आवश्यक असेल. ओटीपीशिवाय सिलिंडरची होम डिलिव्हरी ग्राहकांना ऑनलाईन सिलिंडर बुक करताना पेमेंट करावी लागणार नाही. यानंतर, ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी पाठविला जाईल, जेव्हा गॅस एजन्सीचा कर्मचारी सिलिंडर देण्यासाठी घरी येईल तेव्हा ग्राहकाला हा ओटीपी दाखवावा लागेल, अन्यथा ग्राहकाला सिलिंडर दिला जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.