Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खासदार इम्तियाज जलील द्वारा आयोजित रोजगार मेळाव्यास उदंड प्रतिसाद; १६७० युवकांना मिळाला रोजगार

खासदार इम्तियाज जलील यांनी सुशिक्षीत बेरोजगार युवक व युवतींसाठी सुरु केलेल्या जॉब अलर्टस योजने अंतर्गत आज आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात विविध शैक्षणिक अर्हता असलेल्या ४५३२ सुशिक्षित बेरोजगार युवकांनी विविध नामांकित कंपन्या / आस्थापनेत विविध पदांकरिता मुलाखाती दिल्या असून त्यामधुन विविध नामांकित कंपनी व आस्थपनेत १६७० युवकांना रोजगार मिळाला असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 07, 2022 | 08:31 PM
खासदार इम्तियाज जलील द्वारा आयोजित रोजगार मेळाव्यास उदंड प्रतिसाद; १६७० युवकांना मिळाला रोजगार
Follow Us
Close
Follow Us:

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांनी सुशिक्षीत बेरोजगार युवक व युवतींसाठी सुरु केलेल्या जॉब अलर्टस योजने अंतर्गत आज आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात विविध शैक्षणिक अर्हता असलेल्या ४५३२ सुशिक्षित बेरोजगार युवकांनी विविध नामांकित कंपन्या / आस्थापनेत विविध पदांकरिता मुलाखाती दिल्या असून त्यामधुन विविध नामांकित कंपनी व आस्थपनेत १६७० युवकांना रोजगार मिळाला असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.

खासदार इम्तियाज जलील यांच्या कार्यालयात सकाळी दहा वाजेपासूनच युवकांनी मुलाखत देण्याकरिता प्रचंड गर्दी केली होती. सदरहु मुलाखाती सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत सुरु होत्या.

खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील युवक व युवतींना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावी याकरिता जॉब अलर्टस ही योजना सुरु केली आहे. जॉब अलर्टसच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यातील संपुर्ण समाजातील सर्व स्तरातील विविध कौशल्य आणि शैक्षणिक अर्हता पूर्ण केलेल्या युवक – युवतींना विविध कंपनी / आस्थापनेत रोजगार व स्वयंरोजगाराची संपूर्ण माहिती उपलब्ध करुन देण्यात येते व त्यांच्या शैक्षणिक अहर्तेप्रमाणे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येतात. या योजनेतंर्गत मागील दोन वर्षात ५ हजाराहुन अधिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

नामांकित कंपन्यामध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळणार या हेतुने जिल्हाभरातून बहुसंख्येने युवक शैक्षणिक कागदपत्रे व बायोडाटा घेवुन आजच्या रोजगार मेळाव्यात सहभागी झाले होते. मागील दोन वर्षांपासून लॉकडाऊन असल्यामूळे लाखो तरुणाच्या याकाळात नोकऱ्या गमावल्याने बेरोजगारीचा सामना करावा लागत होता.

खासदार इम्तियाज जलील यांनी बेरोजगारीची समस्या ओळखत जिल्हयातील युवकांसाठी नामांकित कंपन्यात नोकरी मिळावी म्हणुन रोजगार मेळावा आपल्या संपर्क कार्यालयाच्या ठिकाणीच आयोजित केला होता. यावेळी शेकडो युवकांना थेट मुलाखती नंतर नामांकित कंपन्यांत नियुक्ती देण्यात आले. तसेच या रोजगार मेळाव्यास ग्रामीण भागातील तरुणांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. ग्रामीण भागातील युवकांना देखील आजच्या मेळाव्यात प्रचंड प्रमाणात नियुक्ती मिळाल्याने खासदार इम्तियाज जलील समाधान व्यक्त केले.

[read_also content=”कुणाला माहिती नाही, पण माझ्यामागेही ईडी; धनंजय मुंडेंचा खळबळजनक दावा https://www.navarashtra.com/maharashtra/no-one-knows-but-ed-behind-me-dhananjay-mundes-sensational-claim-nrdm-277315.html”]

जलील दोन दिवसात करणार मोठी घोषणा

मागील काही दिवसापासून औरंगाबाद जिल्ह्यातील युवकांच्या मुख्य प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन धार्मिक राजकारण सुरु होते; मात्र खासदार इम्तियाज जलील यांनी युवकांना रोजगार मिळावा संपुर्ण लक्ष केंद्रित केले होते. जिल्ह्याचा सर्वांगिण विकास व्हावा हेच ध्येय समोर ठेवून पुढील दोन दिवसात मोठी घोषणा करणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसार माध्यमांना दिली.

Web Title: Overwhelming response to the job fair organized by mp imtiaz jalil 1670 youths got employment nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2022 | 08:31 PM

Topics:  

  • Aurangabad news
  • Chandrakant Khaire
  • cmomaharashtra
  • Imtiaz Jalil

संबंधित बातम्या

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
1

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

Maratha Reservation : इम्तियाज जलील भगवं उपरणं घालून उतरले आझाद मैदानात! मराठा आरक्षणाबाबत मुस्लीम समाजाची भूमिका काय?
2

Maratha Reservation : इम्तियाज जलील भगवं उपरणं घालून उतरले आझाद मैदानात! मराठा आरक्षणाबाबत मुस्लीम समाजाची भूमिका काय?

पुण्यात तळीरामांची चांदी; दारूबंदीच्या ‘त्या’ आदेशाला हायकोर्टाची स्थगिती
3

पुण्यात तळीरामांची चांदी; दारूबंदीच्या ‘त्या’ आदेशाला हायकोर्टाची स्थगिती

बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची…; काँग्रेसचा बडा नेता संतापला
4

बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची…; काँग्रेसचा बडा नेता संतापला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.