Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CDS Anil Chouhan: हल्ल्यानंतर पाच मिनिटांतच पाकिस्तानला माहिती ….; CDS अनिल चौहानांचा गौप्यस्फोट

या युद्धदरम्यान भारताकडे प्रभावी काउंटर ड्रोन प्रणाली असल्यामुळे मोठा फायदा झाला. युद्धात परिणाम महत्त्वाचा असतो; नुकसान होणे हे व्यावसायिक लष्करासाठी अपरिहार्य असते, मात्र त्यातून शिकून पुढे जाणे हे गरजेचे असते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 04, 2025 | 01:04 PM
CDS Anil Chouhan: हल्ल्यानंतर पाच मिनिटांतच पाकिस्तानला माहिती ….; CDS अनिल चौहानांचा गौप्यस्फोट
Follow Us
Close
Follow Us:

CDS Anil Chouhan on Pakistan Attack:  भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) अनिल चौहान यांनी सिंगापूरमध्ये दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक खुलासे केले होते. ज्यामध्ये त्यांनी पाकिस्तानकडूनही भारताचे लढाऊ विमान पाडल्याची कबुली दिली होती. यामुळे भारतातही मोठी खळबळ उडाली होती. या सगळ्यात सीडीएस अनिल चौहान यांनी आणखी एक खुलासा केला आहे. सीडीएस चौहान यांनी मंगळवारी सांगितले की, भारतीय सैन्याने ७ मे रोजी पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी छावण्यांवर हवाई हल्ले केल्यानंतर पाच मिनिटांतच पाकिस्तानला औपचारिकपणे फोन करून हल्ल्याची माहिती देण्यात आली. जनरल चौहान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘भविष्यातील युद्ध आणि रणनीती’ या विषयावरील विशेष व्याख्यानात बोलत होते. यावेळी बोलताा त्यांनी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करत युद्ध आणि राजकारण यामधील नात्याचे महत्त्व अधोरेखित केले.

सीडीएस अनिल चौहान म्हणाले की, “आम्ही हल्ला केला त्याच दिवशी, म्हणजे ७ मे रोजी पाकिस्तानला हल्ल्याची माहिती दिली होती. भारतीय हवाई दलाने कारवाई पहाटे १ ते १:३० च्या दरम्यान पाकिस्तानात जाऊन ऑपरेशन्स राबवले आणि ऑपरेशन संपल्यानंतर ५ मिनिटांनी आम्ही त्यांना फोन करून सांगितले की आम्ही दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला आहे. अनिल चौहान म्हणाले की, हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी डीजीएमओना स्पष्टपणे सांगितले होते की ही कारवाई फक्त दहशतवाद्यांवर करण्यात आली आहे. यामध्ये नागरिक आणि पाकिस्तानी सैन्याला इजा होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली होती. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही हेच म्हटले होते. ज्यावरून काँग्रेस पक्षाने राजकीय गदारोळ माजवला आहे.

Sudhakar Badgujar News: सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी

सीडीएस चौहान यांनी सांगितले की, भारताने केवळ आठ तासांत पाकिस्तानविरोधात ४८ तासांचे युद्ध संपवले. “१० मे रोजी पहाटे १ वाजता युद्ध संपलं, आणि पाकिस्तानकडून चर्चेचा प्रस्ताव आला,” ऑपरेशन सिंदूरच्या उदाहरणातून त्यांनी युद्ध ही फक्त लष्करी कृती नसून ती एक राजकीय रणनीतीदेखील असते, असेही नमूद केले.

या युद्धदरम्यान भारताकडे प्रभावी काउंटर ड्रोन प्रणाली असल्यामुळे मोठा फायदा झाला. युद्धात परिणाम महत्त्वाचा असतो; नुकसान होणे हे व्यावसायिक लष्करासाठी अपरिहार्य असते, मात्र त्यातून शिकून पुढे जाणे हे गरजेचे असते.

युद्धातील नवे ट्रेंड आणि भारताची तंत्रज्ञान क्षमता

भविष्यातील युद्धांमध्ये तंत्रज्ञानाची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे जनरल चौहान यांनी स्पष्ट केले. त्यांनी तीन महत्त्वाचे ट्रेंड अधोरेखित केले.

सेन्सर तंत्रज्ञान: नैसर्गिक आणि मानवनिर्मित सेन्सर लढाईत महत्त्वाची भूमिका बजावतात. विविध प्रकारचे सेन्सर गरजेनुसार तैनात केले जातात.

Election Commission Of India: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय: आता मतदानाच्या आकडेवारी होणार नाही घोळ

हायपरसोनिक आणि स्टेल्थ तंत्रज्ञान: ब्रह्मोससारख्या क्षेपणास्त्रांचा वापर आणि ड्रोन प्रणालींमुळे अदृश्य राहणाऱ्या हल्ल्यांची शक्यता वाढते.

मानवरहित व स्वायत्त प्रणाली: मानवयुक्त व मानवरहित रणगाड्यांचा वापर भविष्यातील युद्धात निर्णायक ठरू शकतो. यामुळे मानवी धोका कमी होतो आणि लष्करी क्षमता वाढते.

Web Title: Pakistan was informed within five minutes of the attack cds anil chauhan reveals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 01:04 PM

Topics:  

  • India-Pakistan Conflict

संबंधित बातम्या

Pakistan floods : पाकिस्तानात महापुराचे थैमान; 800 हून अधिकांचा बळी, ख्वाजा आसिफ मात्र भारतावर दोषारोपात व्यस्त
1

Pakistan floods : पाकिस्तानात महापुराचे थैमान; 800 हून अधिकांचा बळी, ख्वाजा आसिफ मात्र भारतावर दोषारोपात व्यस्त

Pahalgam Terrorist Attack: पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करणार…; मोदींना अमेरिकेतून फोन, एस. जयशंकरांचा गौप्यस्फोट
2

Pahalgam Terrorist Attack: पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करणार…; मोदींना अमेरिकेतून फोन, एस. जयशंकरांचा गौप्यस्फोट

CDS Anil Chauhan : पाकिस्तानचा ४८ तासांचा होता प्लान, भारतीय सैन्याने ८ तासांत चारली धूळ : CDS अनिल चौहान
3

CDS Anil Chauhan : पाकिस्तानचा ४८ तासांचा होता प्लान, भारतीय सैन्याने ८ तासांत चारली धूळ : CDS अनिल चौहान

विमान का पाडलं गेलं, यापेक्षा महत्त्वाचं आहे का आणि कसं पडलं”? CDSअनिल चौहानांची अप्रत्यक्ष कबूली
4

विमान का पाडलं गेलं, यापेक्षा महत्त्वाचं आहे का आणि कसं पडलं”? CDSअनिल चौहानांची अप्रत्यक्ष कबूली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.