अनधिकृत इमारतींवर पालिकेचा हातोडा, हजारो रहिवाशांचे संसार होणार उध्वस्त
वसई / रविंद्र माने: नालासोपारातील आरक्षित जागेवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत इमारतींवर बांधकामांवर पालिकेने कारवाई सुरु केली आहे. परिसरातील तब्बल 41 अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्याच्या कारवाईला महापालिकेकडून गुरुवारी सुरुवात करण्यात आली आहे. या अनधिकृत बांधकामातील अत्यंत धोकादायक असलेल्या 7 इमारती सर्वप्रथम तोडण्यात येत आहेत मात्र .या इमारतीतील बेघर होणा-या रहिवाशांचे पुनर्वसन कसं होणार याबाबत कोणतीही उपाय योजना पालिकेकडे नसल्याचे आयुक्तांनी जाहीर केले आहे.वसई विरार महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ड’ मधील आचोळे सर्वे नं. 22 ते32 आणि 83 ही जागा “डंपिग ग्राऊंड तसेच मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रासाठी आरक्षित ठेवण्यात आली होती.
या आरक्षित भुखंडावर 2010 पूर्वी सिडकोने नियोजन प्राधिकरणाच्या काळात अतिक्रमण करुन भुमाफियांनी 41अनधिकृत इमारती उभारल्या होत्या.टप्प्याटप्प्याने या इमारतीतील फ्लॅट विकून बिल्डरांनी करोडो रुपये कमवले. याचपार्श्वभूमीवर सदर जागेचे मालक अजय शर्मा यांनी हा प्रकार उघड करुन न्यायालयात दाद मागितली होती.त्यानुसार उच्च न्यायालयाने या इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या या निर्णयामुळे इमारतींमध्ये राहणा-या रहिवाशांनी आपली घरं वाचावित यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.मात्र,आरक्षित जागेचा प्रश्न असल्यामुळे त्यांची याचिका फेटाळण्यात आली. पालिकेने आपली करवाई करावी असे आदेश न्यायालयाने दिले होते.तसेच 31ऑक्टोबर पर्यंत कारवाईचा अहवाल सादर करण्याचेही या आदेशात नमुद करण्यात आले होते.मात्र,निवडणूक असल्यामुळे ही कारवाई पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी सकाळी या कारवाईला सुरवात करण्यात आली.या कारवाईत सी-1 या अत्यंत धोकादायक अशा 7 इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत.
सातारा पालिकेत पाण्याच्या टँकरवरून राडा; माजी नगरसेवकाची अधिकाऱ्यालाच दमदाटी
या 41इमारतींमध्ये साडे बाराशेहून अधिक कुटुंबे राहतात. या रहिवाशांनी सर्व राजकिय नेते आणि न्यायालयाकडे मदत मागितली होती.मात्र याचा अपेक्षित परिणाम झाला नाही.पालिकेने इमारतीतील घरे रिकामी केल्यानंतर अशा रहिवाशांना प्रमाणपत्र देण्यात येतील,ही प्रमाणपत्रे त्यांना पुनर्वसनासाठी उपयोगी येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.तसेच या कारवाईत अडथळा येवून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163अन्वये मनाई आदेश जाहीर केला होता.येथील विजयलक्ष्मी नगर,वसंतनगरी,नालासोपारा या परिसरात प्रवेश करण्यास मनाई आहे असा आदेश पोलीस उपायुक्त पोर्णीमा चौगुले-श्रींगी यांनी जाहीर केला.
पुण्यात ‘या’ कारणांमुळे आला पूर; अहवालाची कार्यवाही होणार; महापालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण
41इमारतीतील बेघर रहिवाशांचे पुनर्वसन नाही. या अनधिकृत इमारतीतील बेघर होणा-या रहिवाशांच्या पुनर्वसनाची कोणताही योजना महापालिकेकडे नाही.पुर्नवसन जिल्हा प्रशासनाकडून केले जाते,तसे आम्ही शासनाला कळवले आहे.बेघर होणा-या रहिवाशांना तशी प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.सी-1 कॅटेगरीतील 7 अत्यंत धोकादायक इमारतींवर सुरवातीला कारवाई करण्यात येणार आहे.त्यानंतर सर्व 41 इमारतींवर कारवाई केली जाईल असं वसई विरार महानगर पालिकेक़डून सांगण्यात आलं आहे.