'विधानसभेला हे शोभणारं नाही, कारवाई झालीच पाहिजे'; विधानभवनातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
पंढरपूर : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे प्रशासनाने अतिशय उत्तम व्यवस्था केली आहे. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आषाढीचे पर्व संपल्यानंतर काही उणिवा राहिल्या काय? हे पुन्हा पाहिले जाईल. पुढच्या वर्षी याहून चांगली व्यवस्था करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी तेथील नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी पत्रकारांनी त्यांचे राज व उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाकडे लक्ष वेधले. त्यावर फडणवीस उपरोधिकपणे म्हणाले, मेळाव्यात रुदालीचे भाषण झाले. मराठीवर एक शब्दही न बोलता, आमचे सरकार गेले, आमचे सरकार पाडले, आम्हाला सरकारमध्ये न्या, आम्हालाच निवडून द्या, असे म्हटले गेले. हा मराठीचा विजयोत्सव नव्हता, ही रुदाली होती.
दरम्यान, या रुदालीचे दर्शन आपल्याला त्या ठिकाणी झाले. मुळात मुंबई महापालिका २५ वर्षे त्यांच्या ताब्यात होती. त्यानंतरही त्यांना दाखवण्यासारखे एकही काम करता आले नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही मुंबईचा चेहरा बदलला. त्यांच्या काळात मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला. आम्ही बीडीडी चाळीतील मराठी माणसांना, पत्राचाळीतील मराठी माणसांना, अभ्युदय नगर येथील मराठी माणसांना त्याच ठिकाणी हक्काचे मोठे घर दिले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा
आज भल्या पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न झाली. आषाढी शुद्ध एकादशीनिमित पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते महापूजा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पांडुरंगाकडे राज्यावरील संकटे दूर होऊदेत, शेतकऱ्यांचे भले व्हावे, चांगले काम करण्याची ताकद द्यावी असे साकडे पांडुरंगाला घातले.
मुख्यमंत्र्यांचेे माऊलींकडे प्रार्थना
वारीच्या माध्यमातून देव आणि भ यांच्यातील अंतर कमी होते. ही पर्वणी अत्यंत आनंददायी आहे. श्री विठ्ठलाच्या पूजेनंतर मला खूप समाधान वाटले. राज्याची काळजी घ्यावी, आम्हाला शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण आणण्यासाठी ताकद द्यावी, असे मी माऊलींकडे प्रार्थना केली.