Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी यात्रेपूर्वी टोकन दर्शन व्यवस्थेची चाचणी; गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती

प्रतिवर्षी चैत्र शुध्द 11 कामदा एकादशी दिवशी चैत्री यात्रा भरते. यावर्षी चैत्री एकादशी दिनांक 4 एप्रिलला संपन्न होत असून, यात्रेचा कालावधीत दिनांक 2 ते 12 एप्रिल असा आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 03, 2025 | 10:45 PM
Ashadhi Ekadashi 2025: आषाढी यात्रेपूर्वी टोकन दर्शन व्यवस्थेची चाचणी; गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी यात्रेपूर्वी टोकन दर्शन व्यवस्थेची चाचणी; गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती

Follow Us
Close
Follow Us:
पंढरपूर:  श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्याचे प्रस्तावित असून, त्याची आषाढी यात्रेपूर्वी टोकन दर्शन व्यवस्थेची चाचणी घेण्याबाबत तसेच  श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन् कामाबाबत पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथे  आज मंदिर समितीची सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीस सदस्या शकुंतलाताई नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, ॲड. माधवीताई निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, ह.भ.प.शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा तसेच वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, जतन संवर्धन कामाचे ठेकेदार रमेश येवले तसेच टिसीएस कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर भीमा सेखर व विविध खात्याचे खाते प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीत मंदिर जतन व संवर्धन कामाचा आढावा घेण्यात आला, त्यामध्ये सध्या गाभारा, बाजीराव पडसाळी, सभामंडप व इतर अनुषंगीक ठिकाणी सुरू असलेली सर्व कामे आषाढी यात्रेपूर्वी पूर्ण करून घेण्यात येणार असून, दगडी कामास कोटींग करणे व वॉटरप्रुफींगची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. याशिवाय, श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्याचे प्रस्तावित असून, त्यांचा आषाढी यात्रेपूर्वी चाचणी  घेण्यासाठी  व  मंदिर समितीचे कार्यालयीन कामकाज गतीमान करण्याच्या दृष्टीने विविध प्रकारच्या संगणक प्रणाली सेवाभावी तत्वावर मोफत उपलब्ध करून देण्याची मंदिर समितीची विनंती टिसीएस कंपनीने मान्य केली आहे. त्यामध्ये ऑनलाईन डोनेशन, भक्तनिवास बुकींग, पुजा बुकींग, लाईव्ह दर्शन व इतर अनुषंगीक बाबींसाठी संगणक प्रणालीचा समावेश आहे. इत्यादीबाबत  निर्णय घेण्यात आल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी यावेळी सांगीतले.

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्याचा मोठा उत्साह; मंदिराला आकर्षक फुलांची सजावट

प्रतिवर्षी चैत्र शुध्द 11 कामदा एकादशी दिवशी चैत्री यात्रा भरते. यावर्षी चैत्री एकादशी दिनांक 4 एप्रिलला संपन्न होत असून, यात्रेचा कालावधीत दिनांक 2 ते 12 एप्रिल असा आहे. या यात्रा नियोजनाचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये या यात्रेला येणा-या भाविकांना आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगीतले.

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्याचा मोठा उत्साह

 पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत. पंढरी म्हणजे वारकऱ्यांसाठी माहेर आहे. वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न होत असतो. या वर्षी देखील या शाही सोहळ्यासाठी पंढरपूरमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळाच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

Web Title: Pandharpur temple co chairman gahininath maharaj ausekar said token darshan system tested before the ashadhi yatra 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2025 | 10:45 PM

Topics:  

  • aashadhi ekadashi
  • Pandharpur News
  • Pandharpur Vitthal Rukmini Temple

संबंधित बातम्या

Sugarcane Bill : प्रतिटनामागे 15 रुपयांची कपात; सरकारच्या निर्णयावरुन शेतकऱ्यांत संतप्त पडसाद
1

Sugarcane Bill : प्रतिटनामागे 15 रुपयांची कपात; सरकारच्या निर्णयावरुन शेतकऱ्यांत संतप्त पडसाद

पंढरपूरमध्ये रेशनचा काळाबाजार, पुरवठा विभागाकडून कारवाईसाठी टाळाटाळ; शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप
2

पंढरपूरमध्ये रेशनचा काळाबाजार, पुरवठा विभागाकडून कारवाईसाठी टाळाटाळ; शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप

कासेगाव परिसरात पुन्हा मुसळधार पावसाचे थैमान; शेतकऱ्यांवर आस्मानी संकट, शेताला तळ्याचे स्वरुप
3

कासेगाव परिसरात पुन्हा मुसळधार पावसाचे थैमान; शेतकऱ्यांवर आस्मानी संकट, शेताला तळ्याचे स्वरुप

Pandharpur : नुकसानग्रस्तांसाठी मनसेचा मदतीचा हात
4

Pandharpur : नुकसानग्रस्तांसाठी मनसेचा मदतीचा हात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.