
Parth Pawar Case:
शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी फसवल्याचा आरोप आमदार महेंद्र दळवी यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप तटकरे यांनी केला आहे.
Farmers E-KYC News: शेतकऱ्यांचे ई-केवायसीकडे दुर्लक्ष; मराठवाड्यात ६.७८ लाख शेतकरी बाकी
रोहा येथील जाहीर सभेत दळवी म्हणाले की, पुण्यातील कोरगाव पार्कमधील जमीन खरेदी प्रकरणावरून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या पार्थ पवार यांना अटक होण्याची शक्यता आहे. अजित पवारही (Ajit pawar) त्यांच्या मुलाला वाचवण्यात व्यस्त आहेत. पण ऐन निवडणुकीच्या काळात हे प्रकरण कसे उघडकीस आले असा प्रश्न आमदार दळवी यांनी उपस्थित केला आहे.
दळवी म्हणाले, सुनील तटकरेच पार्थ पवारांना बदनाम करत आहेत. तटकरे यांचा संपूर्ण राजकीय प्रवास हा फक्त फसवणुकीचा प्रवास आहेत विश्वासघात आणि फसवणूक हीच त्यांची ओळख आहे. स्वतःच्या लोकांचाच विश्वासघात करणे ही त्यांची संस्कृती आहे. स्वतःच्या लोकांना अडकवणे, त्यांचा वापर करणे आणि नंतर त्यांना कलंकित करणे ही त्यांची पद्धत आहे. ज्या नेत्याच्या आश्रयाखाली ते काम करतात त्यांचा विश्वासघात करणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. इतरांना कमी लेखून त्यांनी आपला प्रभाव वाढवला आहे. असा आरोपही महेंद्र दळवी यांनी केल आहे.
कोल्हापूरच्या कुरुंदवाड येथे विवाहितेची आत्महत्या; कुटुंबियांचा सासरच्यांवर गंभीर आरोप
अजित पवार यांना कमकुवत करून भाजपमध्ये सामील होण्याची तयारी करत आहेत. त्यांनी आपले सामान बांधले आहे आणि आता ते “गली ते दिल्ली” मार्ग स्वीकारू शकतात. ते लवकरच भाजपमध्ये सामील होतील. असा दावाही महेंद्र दळवी यांनी केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात शीतल तेजवानी यांचीही कठोर चौकशी करण्यात येत आहे. तपास यंत्रणा विविध अंगांनी पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत असून अनेक शक्यतांचा वेध घेत आहेत. मात्र, अद्याप कोणतेही ठोस पुरावे मिळाले नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या चौकशीबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.