Farmers E-KYC News: शेतकऱ्यांचे ई-केवायसीकडे दुर्लक्ष; मराठवाड्यात ६.७८ लाख शेतकरी बाकी
Senyar Cyclone: 50-60 तासाने होणार विनाश? बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ, ताजे अपडेट जाणून घ्या
परंतू विभागातील ६ लाख ७८ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे ई केवायसी अद्याप झालेले नसल्याचे समोर आले. फार्मर आयडी अर्थात अॅग्रीस्टेंक नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अतिवृष्टी व पुराचा फटका बसलेल्या मराठवाड्यातील बाधित शेतकऱ्यांना जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या नुकसानपोटी मदतनिधी वाटपाचे काम गेल्या काही दिवसापासून सुरु आहे. आतापर्यंत ७० लाख ९२ हजार ७३४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५ हजार २८७ कोटी ५६ लाख रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.
सुमारे ४० टक्के अनुदानाची रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप होणे बाकी असून यात अद्यापही सुमारे पावणेसात लाख शेतकऱ्यांचे ई केवायसी प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. मराठवाड्यात अतिवृष्टी, पुरामुळे मराठवाड्यात ३२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मान्सुनपूर्व पावसाने फटका दिल्यानंतर जुन जुलै महिन्यातही अनेक मंडळात अतिवृष्टी झाली. नुकसानीचे एकीकडे पंचनामे सुरु असतानाच दुसरीकडे पावसाचा कहर देखील सुरुच होता.
पंचनामे पूर्ण करत जिल्हानिहाय निधीची मागणी झाली आणि शासनाने टप्या टप्प्याने जून ते सप्टेंबरपर्यंत झालेल्या नुकसान भरपाईसाठी मदतनिधी मंजूर केला, या निधीचे डीबीटी प्रणालीद्वारे संबंधित बाधित शेतकऱ्यांना गेल्या काही दिवसापासून वाटप सुरु आहे. यात बाधित शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जात आहे. दरम्यान, अतिवृष्टी, पुरामुळे बाधित झालेल्या मराठवाड्यातील शेतक-यांसाठी ८ हजार ७०८ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी शासनाने मंजूर केलेला आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांना सरकारतर्फे अनुदान वितरीत करण्यात आले असून, एकूण ७० लाख ९२ हजार ७३४ शेतकऱ्यांना ५२८७.५६ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्हानिहाय अनुदानाचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत:
छ. संभाजीनगर – बाधित शेतकरी ७,६५,४७५, अनुदान ₹५९९.१३ कोटी
जालना – ५,९२,१७७ शेतकरी, अनुदान ₹४०४.७३ कोटी
परभणी – ८,३३,९२७ शेतकरी, अनुदान ₹५५३.१८ कोटी
हिंगोली – ४,९६,५६६ शेतकरी, अनुदान ₹३९१.८१ कोटी
नांदेड – ११,३१,३५६ शेतकरी, अनुदान ₹९११.३८ कोटी
बीड – १३,३१,८६५ शेतकरी, अनुदान ₹९८४.४९ कोटी
लातूर – ११,५०,७६३ शेतकरी, अनुदान ₹७५५.७० कोटी
धाराशिव – ७,९०,६०५ शेतकरी, अनुदान ₹६८७.११ कोटी
यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, शासनाने पुढील काही दिवसांत जिल्हानिहाय अनुदान वितरण प्रक्रियेला अधिक गती देण्याचे संकेत दिले आहेत.






