Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संतापजनक! डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रूग्णाचा मृत्यू; चेकअप करून घरी गेला अन् थोड्याच वेळात…

राजेंद्र यांच्या मृत्युस कारणीभूत असलेल्या त्या महिला डॉक्टरवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणारनाही, असा पवित्रा घेत रुग्णालयात परिसरात चार तास ठिय्या मांडला.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 08, 2025 | 03:37 PM
संतापजनक! डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रूग्णाचा मृत्यू; चेकअप करून घरी गेला अन् थोड्याच वेळात...

संतापजनक! डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रूग्णाचा मृत्यू; चेकअप करून घरी गेला अन् थोड्याच वेळात...

Follow Us
Close
Follow Us:

डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळेरूग्णाचा  मृत्यू
कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील घटना
वैद्यकीय अधिकाऱ्यांना घालण्यात आला घेराव

कणकवली: प्लेटलेट्स व ब्लडप्रेशर कमी होऊनही कणकवली उपजिल्हा रुग्णालयात अॅडमिट न करता केवळ गोळ्या औषधे देऊन घरी पाठवेलल्या राजेंद्र बळीराम गावडे (५३, रा. वागदे) यांचा घरी गेल्यानंतर मृत्यू झाल्याची दुदैर्वी घटना घडली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या वागदे ग्रामस्थांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत रुग्णालयातील डॉक्टारांना धारेवर धरले.

राजेंद्र यांच्या मृत्युस कारणीभूत असलेल्या त्या महिला डॉक्टरवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणारनाही, असा पवित्रा घेत रुग्णालयात परिसरात चार तास ठिय्या मांडला. त्यामुळे रुग्णालयातील वातावरण तंग झाले होते. व्घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे हे रुगालयात दाखल झाले. पाटील, डॉ. इंगळे यांनी ग्रामस्थ व मृत राजेंद्र यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली.

कुटुंबीयांची आर्थिक मदत देण्याची मागणी

या घटनेनंतर वागदे सरपंच संदीप सावंत, लक्ष्मण घाडीगावकर, माजी नगरसेवक सजय कामतेकर, भाजपचे शहराध्यक्ष अण्णा कोदे, रुपेश आमडोस्कर, समीर प्रभुगावकर, शिवा परब आदीसह ग्रामस्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल होऊन वैद्यकीय अधीक्षक विशाल रेड्डी आणि अन्य डॉक्टर घेराव घालून जाब विचारला. त्यानतर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक सुबोध इंगवले हे चर्चेसाठी आले, त्यावेळी ग्रामस्थांनी त्या महिला डॉक्टरवर कारवाई करा, त्याचबरोबर या घटनेत दोषी असलेल्या डॉक्टरांवर कारवाई करा. तसेच गावडे कुटुंबियांनी आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने सरपंच संदीप सावंत, संजय कामतेकर, अण्णा कोदे, रुपेश आमडोस्कर यांनी केली.

डॉक्टरांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले जाणार का? फलटण येथील डॉक्टराच्या आत्महत्येनंतर ‘थ्री एम’ उपक्रम पुन्हा चर्चेत

घरी पोहोचल्यानंतर काही वेळातच झाला मृत्यू

दरम्यान, गावडे यांच्या मृत्यूप्रकरणी पालकमंत्री नितेश राणे यांनी वैद्यकीय अधिकारी व माजी नगरसेवक संजय कामतेकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे राजेंद्र गावडे या रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णाची प्रकृती गंभीर असताना प्राथमिक तपासणीनंतर घरी पाठवले, रुगण घरी पोहोचताच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या
ग्रामस्थांनी घेराव घालत माणसाचा जीव गेला, त्याला जबाबदार कोण? त्यांना आधार कोण देणार? झालेले नुकसान कसे भरुन येणार? यासह विविध प्रश्नांचा भडिमार डॉक्टरांवर केला. जोपर्यंत नुकसान भरपाई मिळणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. त्यामुळे रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Patient dies due to doctors negligence in kankavali hospital sindhudurga news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 03:35 PM

Topics:  

  • Death
  • Doctor
  • kankavali

संबंधित बातम्या

विवाहित महिला घराबाहेरील बाथरूममध्ये गेली अन्…; देवरुखमध्ये घडली भयंकर घटना
1

विवाहित महिला घराबाहेरील बाथरूममध्ये गेली अन्…; देवरुखमध्ये घडली भयंकर घटना

Supreme Court judgment : मृत्युपत्रावर आधारित नामांतरण अर्ज सुरुवातीलाच फेटाळता येणार नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
2

Supreme Court judgment : मृत्युपत्रावर आधारित नामांतरण अर्ज सुरुवातीलाच फेटाळता येणार नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

रुग्णालयातच पेशंट आणि डॉक्टरमध्ये सुरु झालं घमासान युद्ध, दोघांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी हाणलं अन् मारामारीचा Video Viral
3

रुग्णालयातच पेशंट आणि डॉक्टरमध्ये सुरु झालं घमासान युद्ध, दोघांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी हाणलं अन् मारामारीचा Video Viral

Vinod Kumar Shukla Passed Away: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक विनोदकुमार शुक्ला यांचे निधन, 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4

Vinod Kumar Shukla Passed Away: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक विनोदकुमार शुक्ला यांचे निधन, 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.