Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेकरांनो, थकीत प्रॉपर्टी टॅक्स लवकर भरा; अन्यथा कडक कारवाई केली जाणार

डोंगराळ आणि कठीण भूभाग असताना देखील बांधकाम विविध टप्प्यांमध्ये गतीने सुरू आहे. विशेषत: या रिंगरोड प्रकल्पाव्दारे अनेक मोठ्या पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 11, 2026 | 11:14 AM
Pune News : 'प्रॉपर्टी टॅक्स'चे चेक न वटल्यास आता थेट कारवाई होणार; महापालिका प्रशासनाचा इशारा

Pune News : 'प्रॉपर्टी टॅक्स'चे चेक न वटल्यास आता थेट कारवाई होणार; महापालिका प्रशासनाचा इशारा

Follow Us
Follow Us:

पुणे : थकीत मिळकतकर वसुलीसाठी येत्या आर्थिक वर्षात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. शहरातील थकबाकीदारांकडून कर वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, दीर्घकाळ कर न भरणाऱ्यांविरुद्ध कठोर उपाययोजना करण्याचे सूतोवाच प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच मिळकत कराच्या कक्षेत नसलेल्या मिळकतीवर कर आकारणी करण्यावर भर दिला जाणार आहे.

सध्या महापालिकेसमोर उत्पन्न वाढविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. एकीकडे पालिकेच्या उत्पन्नाचे पारंपरिक स्रोत कमी होत असताना दुसरीकडे मिळकतकराची थकबाकी सातत्याने वाढत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार शहरातील मिळकतकराची थकबाकी जवळपास १७ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे महापालिकेच्या आर्थिक नियोजनावर त्याचा परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

नागरिकांनी थकीत कर भरावा यासाठी मागील काही वर्षांत महापालिकेकडून अनेकदा अभय योजना राबविण्यात आल्या. या योजनांद्वारे दंड व व्याजात सवलत देऊन नागरिकांना कर भरण्यास प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, अनेक नागरिकांनी या सवलतींचा लाभ घेऊनही थकीत कर भरण्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, थकबाकीचा आकडा वाढतच गेला आहे.

महापालिका आयुक्तांनी सांगितले की, मिळकतकर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. मात्र, या विभागाकडून अपेक्षित प्रमाणात उत्पन्न मिळत नाही. शहरात लाखो मिळकतींची अद्याप कर आकारणी झालेली नाही. तसेच काही प्रकरणांमध्ये कर आकारणीमध्ये त्रुटी असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे महसूल वसुलीवर परिणाम होत असून थकबाकी वाढत आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी पुढील वर्षभरात मिळकतकर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांच्याकडून कर वसुलीची प्रक्रिया गतीने राबविण्यात येईल.

नागरिकांना दिल्या गेल्या सवलती

आयुक्तांनी सांगितले की, आतापर्यंत नागरिकांना सवलती देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यातून गेल्या दोन महिन्यांत सुमारे १ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळाले आहे. मात्र, एकूण थकबाकीच्या तुलनेत ही रक्कम अत्यल्प आहे आणि अपेक्षित उत्पन्नात वाढ झालेली नाही. त्यामुळे आता पुढील काळात थकीत मिळकतकर वसुलीसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात येणार आहे.

दीर्घकाळ कर न भरणाऱ्या मिळकतधारकांविरुद्ध…

दीर्घकाळ कर न भरणाऱ्या मिळकतधारकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. गरज भासल्यास मालमत्ता जप्ती किंवा अन्य कायदेशीर उपाययोजना करण्याचाही विचार करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हेदेखील वाचा : Pune Ring Road Update: ८ बोगदे आणि २६ अंडरपास; असा असेल पुण्याचा ‘गेमचेंजर’ रिंग रोड प्रकल्प

Web Title: Pay your outstanding property tax otherwise strict action will be taken says pmc administration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • Property Tax
  • Pune Municipal Corporation

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.