Pune Ring Road Update: ८ बोगदे आणि २६ अंडरपास; असा असेल पुण्याचा 'गेमचेंजर' रिंग रोड प्रकल्प
विशेषः या रिंगरोड प्रकल्याव्दारे अनेक मोठ्या पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. यामध्ये ८ जुळे बोगदे, व्हायाडक्ट, १० पेक्षा जास्त मोठे फूल, २६ अंडरपास, २१ ओव्हरपास, ९ पादचारी अंडरपासचा समावेश आहे. या सर्व संरचना पूर्ण झाल्यानतर रिंगरोडवर अखंड आणि वेगवान कहतूक शक्य होणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कुंपण घालण्याची ही योजना आहे. यामुळे वाहतूक नियंत्रण प्रभावी रित्या करता येईल.
पुणे (Pune) रिंग रोड हा प्रकल्प दोन भागात विभागण्यात आला असून ६५.४५ किमी लांबीचा पश्चिम कॉरिडॉर आणि १०३, १५५ किमी लांबीचा पूर्व कॉरिडॉर सात पॅकेजमध्ये आहे, हा प्रकल्प ४ त ६ लेनचा प्रवेश नियंत्रित महामार्ग आहे, जो पूर्णपणे एकसमान पातळीवर असेल जेणेकरून गाडी चालवताना कोणत्याही आसाशिवाय आरामदायी गाडी चालवता येईल.
पश्चिम कॉरिडॉर पाच पॅकेजमध्ये विभागला गेला आहे. तर पूर्व कॉरिडॉर सात पॅकेजेसमध्ये विभागला आहे. पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरील उसे येथील पश्चिम पैकेज पुणे – बैंगळूरू महामार्गावरील शिवरेला जोडतो, जो सातारा, सांगली, कोल्हापूर आणि बंगळुरूला मुंबईहून जाणाऱ्या वाहनाना पर्यायी मार्ग देतो.
रस्त्याची रचना ताशी १२० किमी वेगमर्यादा लक्षात घेऊन करण्यात येत आहे. यामुळे जलद आणि सुरक्षित प्रवास करणे शक्य होणार आहे.
सध्या उर्स ते शिवरे हा प्रवास पुणे बायपास मार्ग सुमारे ५८ किमी आहे. मात्र हा मार्ग शहराच्या हद्दीतून जात असल्यामुळे साधारणता १ तास २० मिनिटे लागतात रिंगरोड पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास जवळपास अर्ध्या तासाने कमी होऊ शकतो.
१६८.६०५ किलोमीटर हा प्रकल्प लांबीचा
८ पट यामध्ये जुळे बोगदे
१० पेक्षा जास्त मोठे पूल,
२६ अंडरपास
२१ ओव्हरपास
९ पादचारी अंडरपासचा समावेश आहे.
११० मीटर रुंदीचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेगाने पुढे जात आहे
७ व्हायाडक्ट
५,६२२ कोटी रुपये खर्च






