Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCMC Corruption: पिंपरी महापालिकेचा भ्रष्ट कारभार पुन्हा चव्हाट्यावर; अभियंत्यासह ३९ जणांवर एसीबीची कारवाई

PCMC Corruption: निविदांचे प्रस्ताव तयार करण्यापासून ते कामांची बिले मंजूर करणे, मर्जीतील ठेकेदारांसाठी अटी-शर्ती शिथिल करणे आणि अंतिम कामाचे आदेश (वर्क ऑर्डर) देणे या प्रत्येक टप्प्यावर महापालिकेत ‘टक्केवारी’ ठरलेली असल्याची चर्चा उघडपणे सुरू आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 30, 2026 | 04:45 PM
PCMC, Pimpri Chinchwad, Crime News, ACB Action,

PCMC, Pimpri Chinchwad, Crime News, ACB Action,

Follow Us
Follow Us:
  • अभियंता प्रमोद ओंभासे १९ हजारांची लाच घेताना रंगेहाथ
  • सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी यांच्यावरही लाचेचा आरोप
  • पालिकेतील विविध विभागांतील तब्बल ३९ जणांवर एसीबीची कारवाई
PCMC News: राज्यातील सर्वांत श्रीमंत महानगरपालिका असा नावलौकिक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेला लागलेले लाचखोरीचे ग्रहण सुटायला तयार नाही. पाणीपुरवठा विभागातील एका ठेकेदाराच्या निविदा करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यासाठी १९ हजार रुपयांची लाच घेताना मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ ताब्यात घेतले. शहर अभियंता दर्जाच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यावर अशा प्रकारे थेट कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने पालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे राज्यस्तरावर पालिकेची मोठी नाचक्की झाली असून नागरिक व ठेकेदारांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सह शहर अभियंत्यांचीही चौकशी शक्य

तक्रारदार ठेकेदाराने दिलेल्या माहितीनुसार, केवळ ओंभासे यांनीच नव्हे तर सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनीही करारनाम्यावर सही करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. तक्रारीत त्यांचा स्पष्ट उल्लेख असल्याने आता एसीबीचा फास सूर्यवंशी यांच्यावरही आवळला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

INDIA Alliance Public Impeachment Program: इंडिया अलायन्सचा ‘जनमहाभियोग’ कार्यक्रम

‘टक्केवारी’ आणि ‘टेबल मनी’चा सुळसुळाट

निविदांचे प्रस्ताव तयार करण्यापासून ते कामांची बिले मंजूर करणे, मर्जीतील ठेकेदारांसाठी अटी-शर्ती शिथिल करणे आणि अंतिम कामाचे आदेश (वर्क ऑर्डर) देणे या प्रत्येक टप्प्यावर महापालिकेत ‘टक्केवारी’ ठरलेली असल्याची चर्चा उघडपणे सुरू आहे. “खिसा गरम केल्याशिवाय फाईल पुढे सरकत नाही,” अशी पालिकेच्या कारभाराची स्थिती झाली आहे. यापूर्वीही पाणीपुरवठा विभागातील अनुरेखक दिलीप आडे याला कामाचा आदेश देण्याची फाईल पुढे पाठवण्यासाठी तब्बल एक लाख रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते.

२९ वर्षांत ३९ जणांवर गुन्हे दाखल

महापालिकेत १७ फेब्रुवारी १९९७ ते आजअखेरपर्यंत तब्बल ३९ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लाचखोरीप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये तत्कालीन स्थायी समिती अध्यक्षांसह त्यांच्या चार कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. गेल्या नऊ वर्षांच्या (एप्रिल २०१७ ते ऑक्टोबर २०२६) कालावधीत एसीबीच्या जाळ्यात अडकून तब्बल १८ जणांनी तुरुंगाची वारी केली आहे. यामध्ये थेट तत्कालीन आयुक्तांच्या स्वीय सहाय्यकापासून (पीए) ते बीट निरीक्षक, मुख्याध्यापक, सर्व्हेअर आणि कनिष्ठ अभियंत्यांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Badrinath Helicopter Missing: उत्तराखंडमध्ये खळबळ! बद्रीनाथहून निघालेले हेलिकॉप्टर कोसळलं, 6
प्रशासकीय राजवटीतील मनमानी कारभार

१२ मार्च २०२२ ते ६ फेब्रुवारी २०२६ या प्रशासकीय राजवटीत लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्याने लाचखोरीच्या प्रवृत्तीने कळस गाठला होता. या चार वर्षांच्या काळात तब्बल ६ अधिकारी व कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकले. अधिकाऱ्यांच्या निर्ढावलेल्या भूमिकेमुळे पालिकेच्या प्रतिमेला मोठा तडा गेल्याचे आरोप महापालिका सभेत वारंवार होत आहेत.

 

सत्ता बदलली, पण कारभार तोच!

६ फेब्रुवारी २०२६ रोजी महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर तरी लाचखोरीला आळा बसेल, अशी अपेक्षा होती; मात्र नव्या सत्ताकाळातील अवघ्या नऊ महिन्यांतच ३ जण जाळ्यात अडकले आहेत. यामध्ये मुख्य अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक आणि करसंकलन विभागाच्या एका लिपिकाचा समावेश आहे.

 

Web Title: Pcmc chief engineer pramod ombhase arrested by acb bribe case as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 04:45 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.