पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आंध रोड ते सांगवी जोडणारा तिसरा पूल तब्बल ३० कोटी रुपयांच्या खर्चाने बांधण्यात आला. आता त्याचे सौंदर्यीकरण करण्यासाठी बंद करण्यात येणार…
पिंपरी-चिंचवड परिसरात एका महिलेला सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याच्या समर्थकांनी पोलीस स्टेशनमध्ये मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. मारहाण झालेली महिला देखील त्याच पक्षाची पदाधिकारी आहे.
अवधूतला कॉलेज सुरू झाल्यापासून अभ्यासात अडचणी येत होत्या. विशेषतः संगणकशास्त्रातील एका विषयामुळे तो तणावात होता. गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक ताणाखाली असल्याचे मित्रांनी पोलिसांना सांगितले आहे.
तांत्रिकदृष्ट्या पात्र बोलीधारकांची घोषणा दि. ६ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार असून दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता संकेतस्थळावर ई- लिलाव प्रक्रिया सुरु होणार आहे.
थकबाकीदारांना पूर्वीच वारंवार नोटिसा बजावूनही कर न भरल्याने महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत. या कारवाईसाठी 18 विभागीय कार्यालयांमार्फत पथके सक्रिय करण्यात आली आहे.
महापालिकेच्या सर्व विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. तथापि, सहा महिन्यांपेक्षा कमी सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात येणार नाही.
Pune News : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी पुन्हा एकदा भूमकर चौक ते भुजबळ चौक परिसरात ऑन ग्राऊंड पाहणी करून कामांना वेग देण्याचे आदेश दिले.
माता-भगिनींवर अन्याय झाल्यास गप्प बसणार नाही. अशा नराधमांचा चौरंग्या केल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा हिंदू भूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी दिला आहे.
सकाळी ११ वाजल्यापासून १४०० क्युसेक्स इतक्या दराने पाणी सांडव्यावरून पवना नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. हवामानानुसार व येव्यानुसार हा विसर्ग कमी-जास्त केला जाण्याचा अंदाज आहे.
कर संकलन विभागाच्या माहितीनुसार, १ लाख १२ हजार ८०९ निवासी मालमत्तांधारकांकडे सुमारे ३१० कोटी रुपये थकबाकी आहे. यामध्ये अनेक मालमत्तांधारक ५ ते १० वर्षांपेक्षा अधिक काळापासून कर भरत नाहीत.
'तुम्हाला लहान मुलांसारखं वारंवार सांगायचं का? कोणी कधीही येतो, कधीही जातो,' असा सज्जड दमच आयुक्त सिंह यांनी भरला. यापुढे कार्यालयीन वेळेत अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांना 'कारणे दाखवा' नोटीस देण्यात येईल, असेही…
Hinjewadi News: गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे हिंजवडी परिसरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. काही रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. परिणामी, अनेक वाहने पाण्यात अडकली होती
सुट्टीच्या दिवशी प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मेट्रोने शनिवार आणि रविवार तिकीटदरात मुभा दिली आहे. त्यामुळे वीकेंड पर्यटन, खरेदी, बाहेर जाणाऱ्या नागरिकांसाठी मेट्रो अधिक किफायतशीर पर्याय ठरत आहे.
सध्या शहरात सुमारे ७०% सांडपाणी प्रक्रिया न होता थेट नद्यांमध्ये सोडले जाते. पवना आणि इंद्रायणी या नद्यांमध्ये रोज लाखो लिटर अप्रामाणिकरित्या सांडपाणी मिसळते