Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCMC Maha Metro: पिंपरी-निगडी मेट्रो मार्गाला ब्रेक? रस्ते दुरुस्तीच्या मुद्द्यावरून ५० कोटींचा प्रस्ताव चौथ्यांदा तहकूब

Maha Metro News: स्थायी समितीची सभा बुधवारी (दि. ६) अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. केंद्र सरकारने पिंपरी ते निगडी या ४.४१ किलोमीटरच्या मार्गासाठी सुरुवातीला ९१० कोटी १८ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 09, 2026 | 05:08 PM
PCMC, MahaMetro, Abhishek Barne, Pimpri Nigdi Metro, Road Repair,

PCMC, MahaMetro, Abhishek Barne, Pimpri Nigdi Metro, Road Repair,

Follow Us
Close
Follow Us:
  • पिंपरी ते निगडी या विस्तारित मार्गासाठी महापालिकेला स्वतःच्या हिश्शाचे आणि अतिरिक्त स्थानकाचे मिळून ५० कोटी रुपये द्यायचे आहेत.
  • मेट्रोच्या कामामुळे शहरातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. जोपर्यंत मेट्रो प्रशासन हे रस्ते पूर्ववत करत नाही, तोपर्यंत निधी न देण्याचा पवित्रा
  • सलग चार सभांमध्ये हा प्रस्ताव तहकूब झाल्यामुळे मेट्रोच्या पुढील कामासाठी लागणाऱ्या निधी वितरणात अडथळा
 

PCMC Maha Metro: पिंपरी ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्गाचे काम सुरू असताना शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था महामेट्रोला महागात पडण्याची चिन्हे आहेत. जोपर्यंत मेट्रोच्या कामामुळे खराब झालेले रस्ते पूर्ववत केले जात नाहीत, तोपर्यंत निगडी येथील चौथ्या स्थानकासाठीचा महापालिकेचा हिस्सा आणि अतिरिक्त निधी मिळून ५० कोटी रुपये दिले जाणार नाहीत, अशी आक्रमक भूमिका स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी घेतली आहे. यामुळे या विस्तारित मार्गाच्या निधी वितरणावर सध्या टांगती तलवार आहे.

राज्यात 60 ट्रॅफिक गार्डन्स उभारणार; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

सलग चौथ्या सभेत प्रस्ताव तहकूब

स्थायी समितीची सभा बुधवारी (दि. ६) अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. केंद्र सरकारने पिंपरी ते निगडी या ४.४१ किलोमीटरच्या मार्गासाठी सुरुवातीला ९१० कोटी १८ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली होती. मात्र, राज्य शासनाने निगडी येथील टिळक चौकात चौथे अतिरिक्त स्थानक उभारण्याचा निर्णय घेतल्याने प्रकल्पाचा खर्च ९६० कोटी १८ लाख रुपयांवर पोहोचला आहे. यातील अतिरिक्त ५० कोटींच्या खर्चात राज्य शासन आणि महापालिका प्रत्येकी २५ कोटींचा वाटा उचलणार आहे. या विषयाला मंजुरी मिळणे अपेक्षित होते, मात्र रस्ते दुरुस्तीच्या मुद्द्यावरून अध्यक्ष बारणे यांनी सलग चौथ्या सभेत हा प्रस्ताव तहकूब केला.

५५ टक्के काम पूर्ण, पण वाहनचालक त्रस्त

सध्या या मार्गाचे सुमारे ५५ टक्के काम पूर्ण झाले असून व्हायडक्टचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, हे काम करताना निगडी ते चिंचवड दरम्यानचे सेवा रस्ते आणि मुख्य रस्ते मोठ्या प्रमाणात उखडले गेले आहेत. रस्त्यांवरील खड्डे, राडारोडा आणि उडणारी धूळ यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Pune Zp : ऐनवेळी आर्थिक विषयांचा भडीमार; जिल्हा परिषद स्थायी समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

विकासकामे महत्त्वाची असली तरी सर्वसामान्यांचे हाल खपवून घेतले जाणार नाहीत. महामेट्रोने आधी आपले दायित्व ओळखून खराब झालेले रस्ते तातडीने दुरुस्त करावेत. त्यानंतरच महापालिका आपला हिस्सा वर्ग करेल.
अभिषेक बारणे, अध्यक्ष, स्थायी समिती.

 

निधीवर टांगती तलवार

पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपल्या अर्थसंकल्पात मेट्रोसाठी ६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, स्थायी समितीने आता दुरुस्तीची अट घातल्यामुळे महामेट्रोला हा निधी मिळवण्यासाठी आधी शहरातील रस्ते चकचकीत करावे लागणार आहेत. मेट्रो प्रशासनाच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

Web Title: Pcmc maha metro abhishek barne pimpri nigdi metro road repair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 05:08 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.