Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pimpri Chinchwad News: संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करा; भाऊसाहेब भोईर यांची मागणी

Pimpri Chinchwad News: संभाव्य पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने माफक दरात झुणका-भाकर केंद्रे सुरू करण्याचे आवाहनही भोईर यांनी केले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 30, 2026 | 05:45 PM
PCMC, Pimpri Chinchwad, Civic News, Water Crisis, Governance

PCMC, Pimpri Chinchwad, Civic News, Water Crisis, Governance

Follow Us
Follow Us:
  • पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता
  • पाणी बचतीसाठी ठोस उपाययोजना करण्याची भाऊसाहेब भोईर यांची मागणी
  • पिण्याच्या पाण्याने वाहने धुण्यास बंदी घालावी
Pimpri Chinchwad News: शहरातील वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आतापासूनच पाणी बचतीसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे. पाण्याची नासाडी रोखण्याबरोबरच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी सूचनाही त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या पुढे गेली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणीही वाढत असून, भविष्यातील संभाव्य टंचाई लक्षात घेऊन पाणी व्यवस्थापनाचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी पाणीगळती रोखणारे फिरते दुरुस्ती पथक स्थापन करावे. घरांमधील नळ आणि पाइपलाइनमधील गळती मोफत किंवा नाममात्र शुल्कात दुरुस्त करून द्यावी. पिण्याच्या पाण्याने वाहने धुण्यास बंदी घालून नियम मोडणाऱ्यांना किमान एक हजार रुपयांचा दंड आकारावा, अशी मागणी भोईर यांनी केली आहे.

Milk Price Hike : मोठा फटका…1 नोव्हेंबरपासून दूध महागणार! ग्राहकांना प्रति लिटर मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

मोठ्या बांधकामांमधील पाणीवापरावर तात्पुरते निर्बंध घालावेत. सार्वजनिक आणि खासगी विहिरी तसेच बोअरवेलमधील पाणीवापराचे नियोजन करावे. पाणी व्यवस्थापनासाठी विशेष समिती स्थापन करून दर पंधरा दिवसांनी परिस्थितीचा आढावा घ्यावा. नागरिकांमध्ये पाणी बचतीबाबत जनजागृती करणे आणि सांडपाण्याचा पुनर्वापर वाढविण्यावरही भर द्यावा, असे त्यांनी सुचविले आहे.

संभाव्य पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने माफक दरात झुणका-भाकर केंद्रे सुरू करण्याचे आवाहनही भोईर यांनी केले आहे.

INDIA Alliance Public Impeachment Program: इंडिया अलायन्सचा ‘जनमहाभियोग’ कार्यक्रम रद्द

“शहरात पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेने आतापासूनच सतर्क राहावे. पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी नागरिकांनीही महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे,” असे भोईर यांनी म्हटले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पिंपरी-चिंचवडमध्ये पाणी बचतीसाठी  भाऊसाहेब भोईर यांनी कोणती मुख्य मागणी केली आहे?

    Ans: पिण्याच्या पाण्याने वाहने धुतल्यास किमान १,००० रुपयांचा दंड आकारावा, पाणीगळती रोखण्यासाठी फिरते दुरुस्ती पथक स्थापन करावे आणि बांधकामांवरील पाण्याचा वापर मर्यादित करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

  • Que: शहरातील नळ गळती रोखण्यासाठी कोणती नवी संकल्पना सुचवण्यात आली आहे?

    Ans: नागरिकांच्या घरांमधील आणि सार्वजनिक पाइपलाइनमधील नळ गळती मोफत किंवा नाममात्र शुल्कात दुरुस्त करून देण्यासाठी महापालिकेने 'फिरते दुरुस्ती पथक' सुरू करावे, असे सुचवले आहे.

  • Que: पिंपरी-चिंचवडची सध्याची लोकसंख्या किती आहे?

    Ans: पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या ३० लाखांहून अधिक झाली असून पाण्याची मागणी वेगाने वाढत आहे.

Web Title: Pcmc news opposition leader bhausaheb bhoir demands water wastage fine as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 05:45 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.