Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एसटी कर्मचाऱ्यांची ७०० कोटी रुपयांची पीएफ रक्कम गेल्या दहा महिन्यांपासून थकीत, ३००० कर्मचारी जुलै पासून ऍडव्हांसच्या प्रतीक्षेत

सवलत मूल्य रक्कम सरकारकडून अपुरी येत असल्याने कर्मचाऱ्याना आर्थिक झळ , राज्य सरकार बेपर्वाईने वागत असल्याची एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी टीका केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 06, 2024 | 06:34 AM
नववर्ष सेलिब्रेशनसाठी एसटी हाऊस फुल

नववर्ष सेलिब्रेशनसाठी एसटी हाऊस फुल

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी व अधिकारी यांच्या पगारातून कपात केलेली ७०० कोटी रुपयांची रक्कम पी. एफ. ट्रस्टकडे एसटीने भरली नसल्याने आपल्या पीएफ मध्ये जमा असलेल्या रक्कमेतून ऍडव्हांस मागणी करणारे ३००० कर्मचारी जुलै पासून पीएफ ऍडव्हांस रक्कमेच्या प्रतीक्षेत आहेत.गेले अनेक महिने सरकार कडून येणारी सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम अपुरी येत असल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेली पी. एफ. रक्कम ट्रस्ट कडे जमा केली जात नाही.साहजिकच त्या मुळे कर्मचाऱ्याना पी एफ ऍडव्हांस मिळत नसल्याने आर्थिक झळ सोसावी लागत असून विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एसटीला निधी देण्यात राज्य सरकार बेपर्वाईने वागत असल्याची टीका महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे पीएफ व ग्र्याजुटीचे दोन स्वतंत्र ट्रस्ट असून ८७ हजार एसटी कर्मचारी व अधिकारी यांची भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफची अंदाजे ७०० कोटी रुपये व उपदान म्हणजे ग्र्याजुटीची अंदाजे १००० रुपये इतकी रक्कम अशी मिळून अंदाजे १७००कोटी रुपयांची रक्कम गेले दहा महिने एसटीने दोन्ही ट्रस्टकडे भरणा केलेली नाही. पिएफ ट्रस्ट मधून कर्मचारी आपल्या खात्यावरील जमा रक्कमेतून आर्थिक अडचणीच्या वेळी ऍडव्हांस रक्कम घेत असतात पण गेले दहा महिने सरकारकडून अपुरा निधी येत असल्याने एसटीने पीएफ रक्कम ट्रस्टकडे जमा केली नाही.

त्या मुळे ट्रस्टच्या तिजोरीत खडखडाट असून राज्यभरातील एसटीच्या ३००० कर्मचाऱ्याना जुलै पासून आता पर्यंत पीएफची ऍडव्हांस रक्कम मिळाली नाही. आपलीच रक्कम आपल्याला मिळत नसल्याने कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडले असून स्वतःचे आजारपण किंवा कुटुंबीयांचे आजारपण, मुला मुलींची लग्ने, शाळा, कॉलेजची फी भरण्यासाठी सुद्धा हे पैसे वेळेवर मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे .याला मागणीच्या तुलनेत अपुरा निधी देणारे सरकारच जबाबदार असल्याचा आरोपही बरगे यांनी केला आहे.

सवलत मूल्य प्रतिपूर्ती निधी

एसटी महामंडळ प्रवाशांना तिकीट दरात विविध प्रकारच्या सवलती देते त्याची दर महिन्याला सरकारकडून प्रतिपूर्ती रक्कम येत असते. मागणी केलेली पूर्ण रक्कम सरकारने कधीही एसटीला दिली नसून त्या मुळे विविध अडचणीचा सामना करावा लागत असल्याचेही बरगे यांनी म्हंटले आहे.

Web Title: Pf amount of rs 700 crores of st employees is outstanding since last ten months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2024 | 06:34 AM

Topics:  

  • st bus

संबंधित बातम्या

MSRTC News : राज्यातील अवैध वाहतुकीमुळे एसटी संकटात? अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
1

MSRTC News : राज्यातील अवैध वाहतुकीमुळे एसटी संकटात? अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

MSRTC News : एसटी महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते लोकार्पण
2

MSRTC News : एसटी महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते लोकार्पण

एसटी बसचा प्रवास आणखी सुकर होणार; तब्बल 3000 नव्या स्मार्ट बसेस येणार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन
3

एसटी बसचा प्रवास आणखी सुकर होणार; तब्बल 3000 नव्या स्मार्ट बसेस येणार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन

MSRTC News: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘राजमाता जिजाऊ’ एसटी बससेवेचे लोकार्पण, प्रताप सरनाईक यांची माहिती
4

MSRTC News: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘राजमाता जिजाऊ’ एसटी बससेवेचे लोकार्पण, प्रताप सरनाईक यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.