Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Narendra Modi: महाराष्ट्राच्या पैठणीने वेधले PM मोदींचे लक्ष; केवडियातील पर्यटन दालनाला दिली भेट

PM Narendra Modi: राष्ट्रीय एकता दिन आणि भारत पर्व 2026 च्या निमित्ताने गुजरातमधील केवडिया (एकतानगर) येथे 1 ते 15 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आयोजित या उपक्रमात महाराष्ट्र पर्यटन विभाग सहभागी होत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 01, 2026 | 02:35 AM
मोदी यांची महाराष्ट्र पर्यटनाच्या दालनाला भेट

मोदी यांची महाराष्ट्र पर्यटनाच्या दालनाला भेट

Follow Us
Follow Us:
  • प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्र पर्यटनाच्या दालनाला भेट
  • पैठणीच्या समृद्ध विणकाम परंपरेची घेतली माहिती
  • महाराष्ट्राच्या कला, संस्कृती आणि पर्यटनवैभवाचे सादरीकरण
मुंबई/PM Narendra Modi: महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या वतीने गुजरातमधील केवडिया (एकतानगर) येथे राष्ट्रीय एकता दिन आणि भारत पर्व 2026 च्या निमित्ताने आयोजित उपक्रमात पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे विशेष पर्यटन दालन उभारण्यात आले आहे. या दालनाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भेट दिली.

या भेटीदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या पारंपरिक हातमागावरील देखण्या पैठणी साड्यांची पाहणी केली. पैठणी विणकामामागील कलाकुसर, पारंपरिक तंत्र, त्यातील बारकावे आणि महाराष्ट्राच्या समृद्ध वस्त्रपरंपरेची त्यांनी माहिती जाणून घेतली. या माध्यमातून महाराष्ट्राच्या पारंपरिक कला, हस्तकला, सांस्कृतिक वारसा आणि कारागिरांच्या कौशल्याचे दर्शन त्यांना घडले. पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक विजय जाधव आणि त्यांच्या टीमने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.

राष्ट्रीय एकता दिन आणि भारत पर्व 2026 च्या निमित्ताने गुजरातमधील केवडिया (एकतानगर) येथे 1 ते 15 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आयोजित या उपक्रमात महाराष्ट्र पर्यटन विभाग सहभागी होत आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या या विशेष दालनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळे, समृद्ध सांस्कृतिक वारसा, पारंपरिक कला, खाद्यसंस्कृती आणि हस्तकलेचे दर्शन देशभरातील पर्यटकांना घडविण्यात येत आहे.

Mauritania Culture: घटस्फोटित महिलांसाठी भरतो ‘बाजार’? या देशात स्थूल महिलांना मानले जाते सुंदर; विवाहपरंपरा जाणून अजून व्हाल थक्क

या उपक्रमासाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाचे प्रतिनिधी म्हणून छत्रपती संभाजीनगरचे विभागीय उपसंचालक विजय जाधव उपस्थित आहेत. दालनात महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळांची माहिती देणारी माहितीपत्रके आणि पर्यटनविषयक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच पैठणी विणकामाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांचे स्टॉल, पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि हस्तकलेच्या विविध वस्तू ही दालनाची प्रमुख आकर्षणे आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (आयएचएम), दादर येथील किचन स्टुडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचेही सादरीकरण करण्यात येत आहे. याशिवाय, महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडविण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील गड-किल्ले, समुद्रकिनारे, धार्मिक स्थळे, निसर्गरम्य पर्यटनस्थळे, साहसी पर्यटन, ग्रामीण पर्यटन आणि सांस्कृतिक परंपरा यांची माहिती या दालनाच्या माध्यमातून पर्यटकांना देण्यात येत आहे. पैठणीसारखी पारंपरिक वस्त्रकला, स्थानिक खाद्यपदार्थ, हस्तकला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून राज्याच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख करून देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांना राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळण्यासोबतच राज्यातील पर्यटन व्यवसाय, स्थानिक कलाकार, कारागीर आणि खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन मिळणार आहे.

पर्यटन विभागाचे सचिव संजय यादव म्हणाले, “राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने देशातील विविध राज्यांच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांची ओळख करून देणे, परस्पर संवाद वाढविणे आणि विविधतेतील एकतेची भावना अधिक दृढ करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक ओळखीचा, ऐतिहासिक वारशाचा, वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपरंपरेचा आणि पर्यटन क्षेत्रातील विविध संधींचा देशभरातील पर्यटकांसमोर प्रभावीपणे परिचय करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र पर्यटनाच्या दालनाला भेट देऊन राज्याच्या समृद्ध कला, संस्कृती आणि पारंपरिक पैठणी विणकामाची माहिती जाणून घेतली, याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांची ही भेट महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला आणि पर्यटनवैविध्याला राष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक प्रसिद्धी मिळवून देणारी ठरेल.”

नोव्हेंबरमध्ये फिरण्याचा प्लॅन करताय? भारतातील ही ८ ठिकाणं नक्की एक्सप्लोर करा!

पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे म्हणाले की, “महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर एक महत्त्वपूर्ण पर्यटनस्थळ म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी राज्यातील पर्यटनवैविध्याची देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी मांडणी करणे आवश्यक आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पर्यटन विभाग विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर राज्याचे पर्यटनवैभव प्रभावीपणे सादर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. गुजरातमधील केवडिया (एकतानगर) येथे आयोजित या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा, निसर्गसौंदर्य, पारंपरिक कला, खाद्यसंस्कृती आणि सांस्कृतिक परंपरा व्यापक स्तरावर पोहोचविण्याची संधी मिळत आहे.

महाराष्ट्र पर्यटनाच्या दालनाला भेट दिल्याबद्दल आणि राज्याच्या सांस्कृतिक वारशाची दखल घेतल्याबद्दल आम्ही प्रधानमंत्री यांचे मनःपूर्वक आभार मानतो. त्यांच्या या भेटीमुळे महाराष्ट्राच्या पर्यटनवैभवाला राष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक प्रसिद्धी मिळण्यासोबतच राज्यातील पर्यटनस्थळांकडे देशभरातील पर्यटकांचे लक्ष वेधले जाण्यास आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होईल.”

💡

Frequently Asked Questions

  • Que: पंतप्रधान मोदी यांनी कोणत्या दालनाला भेट दिली?

    Ans: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथील महाराष्ट्राचे विशेष पर्यटन दालन येथे भेट दिली.

  • Que: या विशेष दालनाचे महत्व काय?

    Ans: राष्ट्रीय एकता दिन आणि भारत पर्व 2026 च्या निमित्ताने गुजरातमधील केवडिया येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

Web Title: Pm narendra modi visit maharashtra paithani saree in kevadia gujarat tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Maharashtra Tourism
  • PM Narendra Modi
  • tourism

संबंधित बातम्या

ISRO : अमेरिकन GPS ला भारतीय उत्तर! अचूक नेव्हिगेशनसाठी इस्रोने लाँच केला NVS-03 उपग्रह; पंतप्रधान मोदींकडून कौतुक
1

ISRO : अमेरिकन GPS ला भारतीय उत्तर! अचूक नेव्हिगेशनसाठी इस्रोने लाँच केला NVS-03 उपग्रह; पंतप्रधान मोदींकडून कौतुक

Mauritania Culture: घटस्फोटित महिलांसाठी भरतो ‘बाजार’? या देशात स्थूल महिलांना मानले जाते सुंदर; विवाहपरंपरा जाणून अजून व्हाल थक्क
2

Mauritania Culture: घटस्फोटित महिलांसाठी भरतो ‘बाजार’? या देशात स्थूल महिलांना मानले जाते सुंदर; विवाहपरंपरा जाणून अजून व्हाल थक्क

Mallikarjun Kharge remark on PM Modi : खरगेंच्या वक्तव्यावरून राजकारण तापलं! श्रीकांत शिंदेंचा काँग्रेसवर हल्लाबोल
3

Mallikarjun Kharge remark on PM Modi : खरगेंच्या वक्तव्यावरून राजकारण तापलं! श्रीकांत शिंदेंचा काँग्रेसवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.