
निवडणुकीसाठी पीएमपी बस आरक्षित
प्रवाशांना बसतोय मोठा फटका
१४ आणि १५ जानेवारीला बस फेऱ्यांमध्ये मोठी कपात
पुणे: पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक १४ आणि १५ जानेवारी रोजी पीएमपीएमएल (पुणे महानगर परिवहन महामंडळ) बस सेवेत मोठ्या प्रमाणावर कपात करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनाने पीएमपीच्या ताफ्यातील तब्बल १,०५६ बस आरक्षित केल्याने त्याचा थेट फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात दररोज सुमारे १,७५० पीएमपी बस धावत असतात. मात्र, यापैकी १,०५६ बस निवडणूक कामासाठी वापरात घेतल्यामुळे प्रवाशांसाठी केवळ ६९४ बस उपलब्ध राहिल्या आहेत. परिणामी, बस थांब्यांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.निवडणूक साहित्य तसेच मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी पीएमपी बसचा वापर केला जात आहे. मात्र, याबाबत पूर्वकल्पना नसल्यामुळे अनेक प्रवासी बस थांब्यांवर दीर्घकाळ प्रतीक्षा करताना दिसून आले. अनेक ठिकाणी वेळेवर बस न आल्याने कामगार, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
केवळ ३५ टक्के बस रस्त्यावर
सध्या शहरात केवळ सुमारे ३५ टक्के पीएमपी बस रस्त्यावर धावत असल्यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर मोठा ताण आला आहे. खासगी वाहने, रिक्षा आणि इतर पर्यायी साधनांकडे प्रवाशांचा ओढा वाढल्याचेही दिसून आले. त्यामुळे काही भागांत वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली.महापालिका निवडणुकीसाठी पीएमपी बसचा वापर अपरिहार्य असला, तरी अचानक झालेल्या या मोठ्या कपातीमुळे सामान्य प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून, प्रशासनाने याबाबत योग्य नियोजन करावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
ना इंडिकेटर, ना ब्रेक लॅम्प चालू! PMP ची दुरावस्था कधी संपणार? वाहनचालकांना कल्पना न आल्याने…
PMP ची दुरावस्था कधी संपणार?
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) दैनंदिन संचलनातील अनेक बसांमध्ये इंडिकेटर, हेडलॅम्प, टेललॅम्प आणि ब्रेकलॅम्प बंद अथवा तुटलेल्या अवस्थेत आहेत.बस वळताना इंडिकेटरचा सिग्नल न दिल्याने तसेच बस थांबताना ब्रेकलॅम्प न लागल्याने मागील वाहनचालकांना कल्पना येत नाही. परिणामी, रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढत असून विशेषतः पीएमपी बस आणि दुचाकीस्वारांमध्ये वाद-विवाद व भांडणे होण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत.